VIDEO : ऑटोचालकाचा 'हा' जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक; बसताच येतो फोर व्हिलरचा फील 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 03:00 PM2022-01-13T15:00:52+5:302022-01-13T15:04:34+5:30

आम्ही आपल्याला ज्या ऑटोचालकाचा जुगाड सांगणार आहोत, तो पाहून तुम्हीही अवाक व्हाल...

 Auto driver made such desi jugaad for the riders inside view will surprise to you | VIDEO : ऑटोचालकाचा 'हा' जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक; बसताच येतो फोर व्हिलरचा फील 

VIDEO : ऑटोचालकाचा 'हा' जुगाड पाहून तुम्हीही व्हाल अवाक; बसताच येतो फोर व्हिलरचा फील 

googlenewsNext


सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आपण नेहमीच बघतो, ज्यांत देसी जुगाड करून अनेक समस्या सोडवलेल्या दिसतात. मात्र, यात रिस्कदेखील तेवढीच असते. भारतात असे जुगाड मोठ्या प्रमाणावर केले जातात. कारण यामुळे अनेक वेळा मोठ्या समस्याही चुटकीसरशी सुटतात. परदेशात याला लाईफ हॅक ट्रिक असे म्हटले जाते. 

जेव्हा आपल्याला कमी वेळात अधिक काम करायचे असते अथवा अधिकची मेहनत टाळायची असते, तेव्हा आपण काही तरी जुगाड शोधतो. यात कधी यश मिळते, तर कधी अपयशही  येते. मात्र, कमी कष्टात आणि कमी वेळात काम झाले, की लोकांना त्या कामाची पद्धत कॉपी करावीशी वाटते. असाच एक जुगाड करून एका ऑटोचालकाने लोकांना अवाक केले आहे. 

ऑटोवाल्याचा जुगाड पाहून लोक अवाक...- 
आम्ही आपल्याला ज्या ऑटोचालकाचा जुगाड सांगणार आहोत, तो पाहून तुम्हीही अवाक व्हाल. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे, यात एक ऑटोचालकाने आपल्या ऑटोमध्ये कस्टमर्सना कम्फर्ट फील व्हावे यासाठी जबरदस्त जुगाड केल्याचे दिसत आहे.

या ऑटोचालकाने आपल्या ऑटोमध्ये फोर व्हिलरमध्ये वापले जाणारे बॅकसीट लावले आहेत. या मुळे या ऑटोत बसणारे सर्वच जण ऑटोचालकाची तारीफ करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

बसताच येतो फोर व्हिलरचा फील - 
एका महिलेने या ऑटोतून प्रवास केला आणि ती खूश झाली. याचा व्हिडिओदेखील या महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. याशिवाय संबंधित महिलेने तिचा अनुभवही शेअर केला आहे. एवढेच नाही, तर या ऑटोचालकाचा जुगाड पाहून लोकही त्याचे कौतुक करत आहेत.

हा 12 सेकंदांचा व्हिडिओ आपल्याला एखाद्या फोर व्हिलरमध्ये बसल्याचा आनंद देईल. हा व्हिडिओ Valia Babycats नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'हा ऑटो ड्रायव्हर वर्ष 3000 मध्ये जगत आहे.' हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे.

Web Title:  Auto driver made such desi jugaad for the riders inside view will surprise to you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.