हृदयद्रावक! स्वतःच्या अश्रू आणि घामाची अॅलर्जी; 11 वर्षाची मुलगी देतेय गंभीर आजाराशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 02:55 PM2024-01-25T14:55:31+5:302024-01-25T15:15:01+5:30
सुम्माला रात्रभर खाज सुटू लागली. त्यानंतर आई आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली.
जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची अॅलर्जी आहे. काही धुळीपासून तर काही अन्नाशी संबंधित अनेक गोष्टीपासून अॅलर्जी असते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, एखाद्याला अश्रू आणि घामाची अॅलर्जी देखील असू शकते? हो हे खरं आहे. प्रत्यक्षात एका मुलीच्या बाबतीत असं घडलंय. सुम्मा विलियम्स असं या 11 वर्षीय मुलीचं नाव आहे. ती ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहते.
सध्या सुम्मा विलियम्सवर एक्सपेरिमेंटल ट्रीटमेंट सुरू आहेत. ती अत्यंत दुर्मिळ स्किन कंडीशनचा सामना करत आहे. न्यूज एयूच्या रिपोर्टनुसार, तिची आई कॅरेन झिम्नीला पहिल्यांदा तिच्या मुलीच्या स्थितीची जाणीव झाली जेव्हा तिची त्वचा खूप कोरडी झाली. यानंतर चेहरा लाल झाला. त्यात भेगा दिसू लागल्या. सुरुवातीला त्यांना सूर्यप्रकाशामुळे होतं असं वाटले. मात्र, उन्हातही आपली मुलगी थरथर कापत असल्याचं पाहून धक्का बसला.
सुम्माला रात्रभर खाज सुटू लागली. त्यानंतर आई आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली. डॉक्टरांनी तिला अँटीबायोटिक्स दिले. अॅलर्जीमुळे तिच्या संपूर्ण शरीरावर खुणा होत्या. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलीला एक्जिमा हा गंभीर आजार आहे तसेच तिला स्वतःच्या अश्रू आणि घामाची अॅलर्जी आहे. सुम्माला तिच्या अश्रूंची अॅलर्जी आहे आणि जेव्हा ती रडते तेव्हा तिच्या अंगावर पुरळ उठतात.
मुलीला स्वतःच्या घामाची देखील अॅलर्जी आहे, हे अत्यंत हृदयद्रावक आहे. तिला नृत्याची आवड आहे. सुम्मा पुरस्कार विजेती नृत्यांगना देखील आहे. चेहऱ्याला देखील वेदना जाणवत आहेत. त्रास सहन करावा लागत आहे. नवीन इंजेक्शन देऊन तिच्यावर उपचार सुरू आहेत.