नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 10:23 AM2024-01-02T10:23:57+5:302024-01-02T10:24:25+5:30

हे जेव्हा नवरीच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशात लग्नात आलेल्या लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं.

Azamgarh bride kept waiting then groom called and said i will not marry | नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही!

नवरी वाट बघत बसली होती, तेव्हा नवरदेवाचा फोन आला अन् म्हणाला - मी लग्न करणार नाही!

उत्तर प्रदेशच्या आजमगढ जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  इथे 27 डिसेंबर 2023 ला एक नवरी तिच्या नवरदेवाची वाट बघत होती. पण नवरदेव वरात घेऊन आला नाही. असं सांगितलं जात आहे की, हुंडा न मिळाल्याने नवरदेवाने लग्न करण्यास नकार दिला. हे जेव्हा नवरीच्या वडिलांना समजलं तेव्हा त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशात लग्नात आलेल्या लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं.

नंतर सोमवारी नवरी एसपी ऑफिसमध्ये पोहोचली. तिथे तिने सगळं प्रकरण सांगितलं. त्यानंतर एसपीच्या आदेशानंतर पीडितेची तक्रार नोंदवण्यात आली. 
पीडितेने सांगितलं की, अजय सरोज नावाच्या व्यक्तीसोबत तिचं अफेअर होतं. लग्नाचं आमिष दाखवून त्याने तिच्यासोबत अनेकदा शारीरिक संबंध ठेवले. जेव्हा हे पीडितेच्या बहिणीला समजलं तेव्हा तिने अजयच्या आईकडे याबाबत तक्रार केली. ती म्हणाली की, आता अजयला तिच्या बहिणीसोबत लग्न करावं लागेल. पण लग्नाचा विषय ऐकताच अजयने लग्नास नकार दिला.

यानंतर पंचायत बोलवण्यात आली. इथे असं ठरलं की, अजयला या तरूणीसोबत लग्न करावं लागेल. 23 डिसेंबर 2023 ला लग्न ठरलं. यादरम्यान अजयने मावस काका भोला सरोजसोबत बोलण्याच्या बहाण्याने तरूणीला घरी बोलवलं. तरूणी त्याच्या घरी येताच काकाने तिच्यासोबत छेडछाड केली. कशीतरी ती तिथून पळाली. याबाबत तिने कुणाला सांगितलं नाही. कारण तिला वाटत होतं की, लग्नात काही अडथळा होऊ नये.

त्यानंतर जसा लग्नाचा दिवस जवळ आला नवरी तयारी करून वरातीची वाट बघत होती. पण तेव्हाच तिला अजयचा फोन आला. त्याने अजयच्या वडिलांना सांगितलं की, तो वरात घेऊन येणार नाही. लग्न करणार नाही. हे ऐकताच नवरीच्या वडिलांना धक्का बसला. त्यांनी अजयला खूप समजावलं. पण तरी तो तयार नव्हता, अशात त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लग्नात उपस्थित लोकांनी त्याना समजावलं आणि असं करण्यापासून रोखलं. हुंडा न मिळाल्या कारणाने नवरदेवाने लग्नास नकार दिला होता.

एसपी सिटी शैलेंद्र लाल यांनी सांगितलं की, पीडितेच्या तक्रारीवरून नवरदेवा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करून तुरूंगात पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल.

Web Title: Azamgarh bride kept waiting then groom called and said i will not marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.