नवरीच्या शोधात असलेल्या अडीच फुटाच्या अजीम मंसूरीसाठी आलं स्थळ, वाचा काय म्हणाली मुलगी....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 10:25 AM2021-03-20T10:25:08+5:302021-03-20T10:36:23+5:30
अजीम मंसूरीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर रेहानाच्या परिवाराला सुद्धा आशेची किरण दिसली. त्यांनाही वाटलं की, आपलीही मुलगी नवरी होऊ शकते.
शामलीच्या केरानामध्ये राहणारा २ फूट ६ इंच उंचीच्या अजीम मंसूरीचा काही दिवसांपूर्वी व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं त्याने सांगितलं होतं. त्याचा तो व्हिडीओ पाहून यूपीतील गाजियाबादमधून त्याच्यासाठी एक स्थळ आलं आहे. पण अजून अजीमच्या परीवाराने लग्नासाठी होकार दिलेला नाही. गाजियाबादची रेहनाची उंचीही अजीम इतकीच आहे. ती एका गरिब परिवारातील आहे.
अजीम मंसूरीचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर रेहानाच्या परिवाराला सुद्धा आशेची किरण दिसली. त्यांनाही वाटलं की, आपलीही मुलगी नवरी होऊ शकते. रेहानाच्या परिवाराच्या जवळच्या व्यक्तीने अजीमचा व्हिडीओ पाहिला आणि रेहानाच्या परिवाराला संपर्क केला. काही दिवसांपूर्वीच अजीम लग्नाची मागणी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला होता. त्याने पोलिसांना त्याच्यासाठी मुलगी शोधण्याची विनंती केली होती. (हे पण वाचा : 'ही' तरूणी आहे लेडी 'गजनी', गर्लफ्रेन्ड आणि परिवाराचीही तिला राहत नाही आठवण!)
२६ वर्षीय अजीमने याआधीही यूपीतील मोठ्या नेत्यांची भेट घेऊन नवरी शोधण्याची मागणी केली होती. पण त्याच्या हाती केवळ निराशा आली. अशीच अवस्था रेहानाच्या परिवाराची आहे. २५ वर्षीय रेहानाला सुद्धा लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये. रेहानाची उंची अडीच फूट आहे. आणि ती घरातील सगळी कामे करते. आता रेहानाच्या परिवाराला अपेक्षा आहे की, ही सोयरीक जुळावी. (हे पण वाचा : नशिब पालटलं ना राव! 'लग्न लावून द्या' म्हणणाऱ्या आझीमसमोर लागलीये मुलींची रांग; म्हणे अशीच नवरी हवी.....)
रेहानाने आजतकसोबत बोलताना सांगितले की, तिला अजीम पसंत आहे आणि तिने त्याचा व्हायरल व्हिडीओ पाहिला आहे. रेहाना घरातील सगळी कामे करते. तसेच ती शिवणकामही शिकली आहे. तर अजीम एक व्यावसायिक आहे आणि त्याला एक हाउसवाइफ हवी आहे. रेहानाची आई याशमीन म्हणाल्या की, त्यांचं मुलीचं लग्न ठरावं यापेक्षा मोठी कोणती बाब असू शकत नाही. अजीमच्या घरी रेहाना फोटो पाठवण्यात आला आहे.
रेहानाचे वडील म्हणाले की, अजीम आणि रेहानाची जोडी चांगली दिसेल. अजीमच्या घरी रेहानाचं स्थळ घेऊन जाणाऱ्या हारूनने सांगितले की, अजीमच्या वडिलांसोबत फोनवर बोलणं झालं होतं आणि त्यांना मुलीचा फोटो पाठवण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की, हे लग्न जुळावं.