Baba Vanga: सन २०२२ मध्ये ‘या’ घटना जगाला हादरवणार! पाहा, बाबा वंगा यांची धक्कादायक भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 11:14 AM2021-12-25T11:14:07+5:302021-12-25T11:15:22+5:30
Baba Vanga: बाबा वंगा यांची भाकिते यंदाही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
सन २०२२ ची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. सन २०२१ च्या कटू आठवणी मागे सोडून संपूर्ण जग २०२२ कडे आशादायी आणि सकारात्मक वर्ष म्हणून पाहात असल्याचे सांगितले जात आहेत. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक जण नवीन संकल्प, नवीन गोष्टी करण्याचा विचार करत असतात. यासह आगामी वर्ष कसे असेल, याबाबत काही शक्यताही वर्तवल्या जातात. यातच बल्गेरियामधील बाबा वंगा यांची भविष्यवाणी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.
बाबा वंगा यांनी आतापर्यंत अनेक भाकिते वर्तवली आहेत. सोशल मीडियावर बाबा वंगा यांच्या भविष्यवाणीच्या गोष्टी खूप व्हायरल होत असतात. लहान वयातच बाबा वंगा यांची दृष्टी गेली होती. मात्र, जगात घडणाऱ्या घटना त्यांना समजत असत. बाबा वंगा यांना बाल्कन नॉस्ट्राडेमस असेही संबोधले जाते. बाबा वंगा यांनी २०२२ साठी केलेली भाकिते खूपच धक्कादायक असल्याचे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
सायबेरियात नव्या विषाणूचा लागेल शोध
गेल्या दीड ते पावणे दोन वर्षांपासून अवघे जग कोरोना संकटाच्या तडाख्यातून जात आहे. अजूनही कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत नाही. उलट नवनवीन व्हेरिएंट आढळून येत असल्यामुळे जगाची चिंता वाढत चालली आहे. यातच बाबा वंगा यांनी येत्या वर्षात सायबेरियामध्ये एका नव्या विषाणूचा शोध लागेल, असे भाकित केले आहे. सायबेरियामध्ये संशोधकांना एक प्राणघातक विषाणू सापडेल जो आतापर्यंत गोठलेला होता. ग्लोबल वॉर्मिंग वाढल्याने हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरेल, अशी भविष्यवाणी बाबा वंगा यांनी केली आहे.
भारतात टोळांचा हल्ला, कमाल तापमान ५० अंशांवर
आताच्या घडीला थंडीने संपूर्ण देश गोठताना दिसतोय. मात्र, सन २०२२ मधील उन्हाळा प्रचंड तप्त असल्याचे सांगितले जात आहे. सन २०२२ मध्ये भारतात तापमान मोठी वाढ होईल. देशात कमाल तापमान ५० अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचेल. तापमान वाढीमुळे टोळांचे प्रमाण वाढेल हे टोळ शेतातील पिकांवर हल्ला करतील. यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, असे भाकित बाबा वंगा यांनी केले आहे.
भूकंप, त्सुनामीत वाढ आणि पाण्याची टंचाई
सन २००४ मधील त्सुनामीबाबत भविष्यवाणी केली होती. आता पुन्हा सन २०२२ मध्ये त्सुनामीबाबात बाबा वंगा यांनी भाकित केले आहे. अनेक आशियाई देश तसेच ऑस्ट्रेलियात भूकंप आणि त्सुनामी होऊ शकते, असे सांगितले जात आहे. तसेच याउलट 2022 मध्ये अनेक देश आणि शहरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू शकते. लोकसंख्या वाढणे आणि नद्यांचे प्रदूषण यामुळे आपल्यापैकी अनेकांना कारणांमुळे जगात पाण्याची टंचाई निर्माण होईल.
एलियन्सचा पृथ्वीवर हल्ला
बाबा वंगा यांनी त्यांच्या भविष्यवाणीत असे सांगितले आहे की, सन २०२२ मध्ये ‘ओमुआमुआ’ नावाचा एक लघुग्रह एलियनद्वारे पृथ्वी ग्रहावरील जीवनाचा शोध घेण्यासाठी पाठवला जाईल, त्यानंतर हे एलियन पृथ्वीवरील लोकांवर हल्ला करू शकतात. तसेच लोकांचा गॅजेट्स समोरील स्क्रिन टाईम वाढेल. यामुळे लोकांची मानसिक स्थिती बिघडेल, असे भाकितही बाबा वंगा यांनी केले आहे.