शिंगासकट आणि लिंगाशिवाय जन्माला आलं विचित्र बाळ, कारण कळताच डॉक्टरांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 06:39 PM2022-08-31T18:39:43+5:302022-08-31T19:11:27+5:30

या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.

baby born with horn at the place of leg and without private part | शिंगासकट आणि लिंगाशिवाय जन्माला आलं विचित्र बाळ, कारण कळताच डॉक्टरांना बसला धक्का

शिंगासकट आणि लिंगाशिवाय जन्माला आलं विचित्र बाळ, कारण कळताच डॉक्टरांना बसला धक्का

googlenewsNext

एक धड आणि दोन डोकी, एकाच बाळाला तीन किंवा चार हातपाय अशा विचित्र जन्माला आलेल्या बाळांची काही प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. अशाच आणखी एका विचित्र बाळाला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. या बाळाला पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. या बाळाला पाय नाहीत पण पायाच्या जागी शिंग आहे आणि त्यातही शॉकिंग म्हणजे त्याला प्रायव्हेट पार्टही नाहीत.

मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यात हे विचित्र बाळ जन्माला आलं आहे. भोडन गावातील महिलेला प्रसूतीसाठी मनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. तिने नवजात बाळाला जन्म दिला. बाळाच्या कमरेच्या वरील भाग सामान्य माणसांसारखाच आहे. कमरेखालील भाग विचित्र आहे.  त्याचे दोन्ही पाय असे जुळलेले आहेत जणू गेंड्याचं शिंगच वाटत आहे. त्याला बोटं नाहीत. त्याच्या अशा पायामुळे मलमूत्र विसर्जन म्हणजे शौच आणि लघवी करण्याची जागाच त्याला नाही.

असं विचित्र बाळ पाहून डॉक्टरही शॉक झाले. त्यांनी आई आणि बाळ दोघांनाही शिवपुरी रुग्णालयात पाठवलं. जिथं बाळाला एसएनसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. आज तकच्या रिपोर्टनुसार 24 तासांनंतरही हे बाळ निरोगी आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, नवजात बाळाचा विकास झालेला नाही. ते अविकसित जन्माला आलं आहे.

 

 

 

 

 

 

Web Title: baby born with horn at the place of leg and without private part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.