या बाळाला अमेरिकेत म्हटलं जातंय 'बेबी गोरीला', पूर्ण अंगावर इतके केस असण्याचं कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 04:04 PM2021-08-22T16:04:19+5:302021-08-22T17:09:12+5:30
अमेरिकेत एका चार महिन्यांच्या मुलावर एका औषधाचा इतका दुष्परिणाम झाला की त्याच्या संपूर्ण शरीरावर केस वाढले. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत हाइपरइंसुलिनिस्म (Hyperinsulinism) म्हणतात.
तुम्ही आतापर्यंत अनेक दुर्मिळ आजारांबद्दल ऐकलं असेल. अनेकदा औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण आता तुम्ही जे सांगणार आहात, कदाचित तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. अमेरिकेत एका चार महिन्यांच्या मुलावर एका औषधाचा इतका दुष्परिणाम झाला की त्याच्या संपूर्ण शरीरावर केस वाढले. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत हाइपरइंसुलिनिस्म (Hyperinsulinism) म्हणतात.
जेव्हा पालकांना त्याच्या मुलाच्या दुर्मिळ आजाराबद्दल कळलं तेव्हा त्यांनी बाळाच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार सुरू केले. ज्यामुळे मुलाचं आरोग्य सुधारलं पण त्याचे दुष्परिणामही झाले. त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यावर लोकांनी अत्यंत विचित्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र यावर 'लोकं काय विचार करतात याची मला पर्वा नाही, मी फक्त माझ्या मुलाबरोबर आनंदी आहे,' असं मत बाळाच्या आईने व्यक्त केलं.
मुलाच्या आईने सोशल मीडिया आणि नेटीझन्सना सांगितलं की, तिच्या मुलाला रोगाशी लढण्यासाठी डायझॉक्साईड औषध द्यावं लागतंय. औषधाच्या दुष्परिणामामुळे त्याच्या शरीरावर दाट आणि केस वाढू लागले. हळूहळू केस संपूर्ण शरीरावर आले. यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर केस दिसू लागले.
या बाळाचं नाव मातेओ हर्नांडेझ आहे. जेव्हा तो अवघ्या एका महिन्याचा होता, तेव्हा त्याला हाइपरइंसुलिनिस्म नावाच्या आजाराचं निदान झालं. डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, या आजारात, स्वादुपिंडातून हाय लेवलंच इन्सुलिन तयार होऊ लागतं. ही रक्तातील साखरेशी संबंधित समस्या आहे. हा दुर्मिळ आजार मानला जातो कारण ५० हजार मुलांपैकी एकाला हा आजार होण्याची शक्यता असते.