दुर्मिळ! 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह जन्माला आलं बाळ; डॉक्टरही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 09:14 AM2021-11-09T09:14:26+5:302021-11-09T09:15:51+5:30

Baby boy born with 12 cm long true human tail : शेपटीसह एका बाळाचा जन्म झाला आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असून डॉक्टरही यामुळे हैराण झाले आहेत.

babyboy born with 12 cm long true human tail in brazil extremely rare case in medical history | दुर्मिळ! 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह जन्माला आलं बाळ; डॉक्टरही झाले हैराण

दुर्मिळ! 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह जन्माला आलं बाळ; डॉक्टरही झाले हैराण

googlenewsNext

लहान मुलं सर्वांनाच आवडतात. पण तुम्हाला जर कोणी लहान मुलाला शेपटी आहे असं सांगितलं तर सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक घटना ब्राझीलमध्ये घडली आहे. 12 सेंटीमीटर लांबीच्या शेपटीसह एका बाळाचा जन्म झाला आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असून डॉक्टरही यामुळे हैराण झाले आहेत. कोट्यवधींमध्ये एखादच लहान बाळ असा जन्म घेत असल्याचं आता समोर आलं आहे. या बाळाच्या शेपटीचं टोक क्रिकेटच्या बॉलसारखं गोल होतं.

डॉक्टरांनी शेपटीसह अशाप्रकारे बाळ जन्माला येणं हे अत्यंत दुर्मिळ असल्याचं म्हटलं आहे. बाळाच्या जन्मासंबंधित महत्त्वाची माहिती आणि काही फोटो हे एका मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. ब्राझीलच्या फोर्टालेजा या शहरातील अल्बर्ट सबिन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये बाळाचा जन्म झाला आहे. अल्ट्रासाऊंड स्कॅननंतर मुलाच्या नर्वस सिस्टममधून शेपूट असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. जर्नल ऑफ पीडियाट्रिक सर्जरी केस रिपोर्टनुसार, ऑपरेशन दरम्यान बाळाला कोणताही त्रास झालेला नाही.

शेपटीचं टोक क्रिकेटच्या बॉलसारखं गोल

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आईच्या गर्भात असताना प्रत्येक भ्रूणालाच शेपटी असते. भ्रूण जसजसा मोठा होत जातो, त्याला आकार येत जातो, तसतशी शेपटी नष्ट होते; मात्र काही अगदी दुर्मिळ केसेसमध्ये ही शेपटी जन्मानंतरही तशीच राहते. या बाळाबाबतही असंच झालं. बाळाची शेपटी मांसाची होती आणि त्यात कोणतंही हाड नव्हतं. या बाळाच्या शेपटीची लांबी 12 सेटींमीटर इतकी वाढली होती. या शेपटीचं टोक क्रिकेटच्या बॉलसारखं गोल होतं. हे पाहून सुरुवातीला डॉक्टर्सही हैराण झाले होते.

शेपटीसह 40 बाळं जन्माला आल्याची नोंद

आतापर्यंत हाड नसलेल्या शेपटीसह 40 बाळं जन्माला आल्याची नोंद आहे. मात्र ही शेपटी मज्जासंस्थेशी जोडली गेली नव्हती. त्यामुळे ती ऑपरेशन करून काढता येऊ शकली, असं सोनोग्राफीच्या वेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्याप्रमाणे ती काढण्यात आली. या बाळाचा जन्म नियोजित तारखेआधी झाला होता. बाळाची तब्येत व्यवस्थित आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: babyboy born with 12 cm long true human tail in brazil extremely rare case in medical history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.