83 हजार रूपयात खरेदी केली होती बॅग, पुन्हा विकली तेव्हा मिळाले 15 कोटी रूपये; कारण....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 10:19 AM2024-05-11T10:19:11+5:302024-05-11T10:19:42+5:30

अमेरिकेतील महिलेने ही बॅद 83 हजार रूपयांमध्ये खरेदी केली होती. पण नंतर तिला समजलं की, या बॅगची मूळ किंमत 15 कोटी रूपये आहे. 

Bag was bought for 83 thousand rupees, got 15 crore rupees when sold again; know the reason | 83 हजार रूपयात खरेदी केली होती बॅग, पुन्हा विकली तेव्हा मिळाले 15 कोटी रूपये; कारण....

83 हजार रूपयात खरेदी केली होती बॅग, पुन्हा विकली तेव्हा मिळाले 15 कोटी रूपये; कारण....

ते म्हणतात कधी कुणाचं नशीब चमकेल काहीच सांगता येत नाही. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. या महिलेने एक बॅग खरेदी केली, पण तिला नव्हतं माहीत की, ही बॅग किती मौल्यवान आहे. महिलेला समजलं की, ही बॅग ऐतिहासिक आहे आणि जगात केवळ एकच आहे. अमेरिकेतील महिलेने ही बॅद 83 हजार रूपयांमध्ये खरेदी केली होती. पण नंतर तिला समजलं की, या बॅगची मूळ किंमत 15 कोटी रूपये आहे. 

द सनच्या रिपोर्टनुसार 2017 मध्ये ही घटना घडली होती. अमेरिकेच्या नॅन्सी ली कार्लसनला स्पेससंबंधी वस्तू गोळा करणं आवडत होतं. 2014 मध्ये तिला समजलं की, यूएस मार्शल सर्विसकडून ऑनलाइन गवर्नमेंट ऑक्शन साइटवर एक बॅग विकली जात आहे. या बॅगबाबत दावा केला जात होता की, ही बॅग नील आर्मस्ट्रॉन्गची आहे. याचा वापर त्याने चंद्रावरून दगड आणि माती आणण्यासाठी केला होता.

नॅन्सीने 83 हजार रूपयांमध्ये ही बॅग खरेदी केली आणि बॅगबाबत जाणून घेण्यासाठी ही बॅग नासाकडे पाठवली. नासाने बॅगबाबत माहिती तर दिली, पण बॅग परत करण्यास नकार दिला. नासाने सांगितलं की, ही बॅग चुकून लिलावासाठी पाठवली गेली. ही बॅग नासाची प्रॉपर्टी आहे. ही बाब नॅन्सीला वाईट वाटली आणि तिने नासावर केस दाखल केली. हैराण करणारी बाब म्हणजे ती केस जिंकली आणि नासाने तिला ती बॅग परत केली. 2017 मध्ये नॅन्सीने ठरवलं की, ही बॅग ती आता जवळ ठेवणार नाही. तिने या बॅगेचा लिलाव करण्याचं ठरवलं.

बॅग दिसायला फार साधारण आहे. त्यावर लिहिलं आहे की, लूनर सॅम्पल रिटर्न. एक्सपर्टने सांगितलं की, या बॅगला 2 मिलियन डॉलर इतकी किंमत मिळेल. 20 जुलै 2017 ला या बॅगचा न्यूयॉर्कमध्ये स्पेस एक्सप्लोरेशनच्या लिलावात ठेवण्यात आलं. 12 इंचाच्या या बॅगला 1.8 मिलियन डॉलर म्हणजे 15 कोटी रूपये किंमत मिळाली. 83 हजारांच्या बदल्यात नॅन्सीला 15 कोटी रूपये मिळाले. या बॅगवर चंद्रावरून आणलेली माती, स्पेस रॉकचे छोटे कण होते. ज्यामुळे बॅगची किंमत वाढली.

Web Title: Bag was bought for 83 thousand rupees, got 15 crore rupees when sold again; know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.