संपूर्ण राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन, इथेच संपते रेल्वे लाइन, जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2023 09:43 PM2023-03-06T21:43:42+5:302023-03-06T21:44:07+5:30
11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेला देशाची लाइफलाइन म्हटले जाते. कारण दररोज कोट्यवधी लोक आपले गाव, घर, शहर आणि कार्यालयांपर्यंत पोहोचण्यासाठी रेल्वेने प्रवास करतात. देशात रेल्वेचे मोठे जाळे असून सुमारे आठ हजार रेल्वे स्टेशन आहेत.
रेल्वे स्टेशनची संख्या प्रत्येक राज्यात हजारोंच्या घरात आहे, पण भारतातील एक राज्य असे आहे, जिथे फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. 11 लाख लोकसंख्येसाठी एकच रेल्वे स्टेशन असलेले हे राज्य कोणते आहे? ते जाणून घेऊया...
मिझोराम हे भारताच्या ईशान्येकडील असे राज्य आहे, याठिकाणी फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे. मिझोराममधील बइरबी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर भारतीय रेल्वेचा प्रवास संपतो. या स्टेशनवरून प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त मालाची वाहतूकही केली जाते.
मिझोराममध्ये असलेले बइरबी रेल्वे स्टेशन, हे राज्यातील एकमेव स्टेशन आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही राज्यात रेल्वे स्टेशन नाही. अकरा लाख लोकसंख्येच्या राज्यात एकच रेल्वे स्टेशन असेल तर लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार, हे उघड आहे. दुसरे स्टेशन स्थानक नसल्यामुळे राज्यातील सर्व लोक प्रवासासाठी बइरबी रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात.
3 प्लॅटफॉर्म असलेल्या स्टेशनवर सुविधांचा अभाव
3 प्लॅटफॉर्म असलेल्या बइरबी रेल्वे स्टेशनवरही सुविधांचा अभाव आहे. या रेल्वे स्टेशनचा कोड BHRB आहे. स्टेशनवर गाड्यांच्या वाहतुकीसाठी 4 ट्रॅक आहेत. 2016 मध्ये या स्टेशनचा पुनर्विकास सुरू करण्यात आला होता, कारण पूर्वी हे स्टेशन खूपच लहान होते.
दुसरे रेल्वे स्टेशन बांधण्याचा रेल्वेचा प्रस्ताव
याचबरोबर, बइरबी रेल्वे स्टेशन 84 किमी अंतरावर असलेल्या स्टेशन कथाकल जंक्शन रेल्वे स्टेशनशी जोडलेले आहे. त्यातील 2 किमीचा भाग मिझोराममध्ये येतो. दरम्यान, याठिकाणी दुसरे रेल्वे स्टेशन सुद्धा बांधण्याचाही रेल्वेचा प्रस्ताव आहे.