बेकरी चालवणाऱ्या महिलेचा लाखोंचा हिरा हरवला, आता सतावते तिला या गोष्टीची चिंता!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:04 PM2024-04-12T13:04:17+5:302024-04-12T13:04:40+5:30
कनसासमधील एक अशीच बेकरीची मालकीन दु:खी आहे. तिच्या अंगठीतील एक मोठा हिरा अचानक गायब झाला.
बरेच लोक हाताच्या बोटांमध्ये हिरेजडीत अंगठ्या घालतात. लोकांना चमकदार हिरे खूप आवडतात. अशात जर एखाद्या व्यक्तीच्या हातात हिऱ्याची अंगठी असेल आणि एक दिवस त्यांना त्यातील हिरे गायब झाल्याचं दिसलं तर काय होईल? अर्थात त्यांना धक्का बसेल. कनसासमधील एक अशीच बेकरीची मालकीन दु:खी आहे. तिच्या अंगठीतील एक मोठा हिरा अचानक गायब झाला.
कुठे गेला हिरा?
ही महिला अमेरिकेच्या कनसास शहरात राहणारी आहे ती सिस स्वीट्स कुकीज अॅन्ड कॅफे चालवते. न्यूयॉर्क पोस्टनुसार, महिलेला वाटतं की, कुकीचं पिठ मळताना अंगठीतील हिरा निघून पडला असेल आणि कुकीजसोबत बेक झाला असेल. हा हिरा त्यांच्या एंगेजमेंट रिंगमध्ये लागला होता.
महिलेनुसार, गेल्या चार दशकांपासून ती ही अंगठी घालत आहे. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तिने लिहिलं की, माझ्याकडून कुकीज खरेदी केल्या असतील तर तुमच्यासाठी बोनस आहे. माझा डायमंड मिसिंग आहे. बेकिंग करताना मी ग्लव्स घालत नाही. मी अंगठी 36 वर्षापासून घातली आहे. जर तो कुणाला सापडला तर मला तो परत करा. मी तुमची आभारी असेल.
या पोस्टमध्ये महिलेने हेही क्लिअर केलं की, ती तिची रिंग काढणार नाहीये. KMBC 9 सोबत महिलेने सांगितलं की, हिरा अंगठीत दिसला नाही तेव्हा ती घरून लगेच बेकरीमध्ये आली. तिने हिरा शोधला. पण सापडला नाही. तिला वाटतं की, एखाद्या कुकीमध्ये हिरा गेला असेल. त्यामुळे लोकांना काळजी घेण्यास सांगितलं आहे. जेणेकरून कुणाच्या दातांनी हिरा तुटू नये.