Balenciaga trash pouch: दिग्गज कंपनीने लाँच केली महागडी कचऱ्याची पिशवी; किंमत ऐकून चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 07:27 PM2022-08-08T19:27:50+5:302022-08-08T19:29:51+5:30

Balenciaga trash pouch price: एका फॅशन ब्रँड कंपनीने जगातील सर्वात महागडी कचऱ्याची पिशवी लाँच केली आहे.

Balenciaga trash pouch: Fashion house Balenciaga launched an expensive trash bag; worth Rs 1.4 Lakh | Balenciaga trash pouch: दिग्गज कंपनीने लाँच केली महागडी कचऱ्याची पिशवी; किंमत ऐकून चक्रावून जाल...

Balenciaga trash pouch: दिग्गज कंपनीने लाँच केली महागडी कचऱ्याची पिशवी; किंमत ऐकून चक्रावून जाल...

Next

Balenciaga trash pouch price: सोशल मीडियावर परत एकदा लक्झरी फॅशन हाउस Balenciaga आपल्या नवीन प्रोडक्टचे नाव आणि त्याच्या किमतीवरुन चर्चेत आले आहे. कंपनीने यावेळेस एक कचऱ्याची पिशवी बाजारात आणली आहे. पण, ही साधीसुधी कचऱ्याची पिशवी नसून, जगातील सर्वात महाग कचऱ्याची पिशवी आहे. सोशल मीडियावर आता याचीच चर्चा होत आहे.

जगावेगळे काम करणाऱ्यांचे नेहमीच नाव होत असते. पण, कधीकधी यावरुन ट्रोलचा सामना करावा लागू शकतो. बाजारात असे अनेक फॅशन ब्रँड आहेत, ज्यांची आपल्या उत्पादनामुळे नेहमीच चर्चा होत असते. अशीच चर्चा आता फॅशन हाउस Balenciagaची होत आहे. कंपनीने 'ट्रैश पाउच' (Trash Pouch) नावाने एक कचऱ्याची पिशवी लाँच केली आहे. या बॅगला Balenciaga च्या फॉल 2022 रेडी-टू-विअर कलेक्शनमध्ये ठेवण्यात आले. मॉडेलने या बॅगसह रँपवॉकदेखील केले. विचित्र डिझाइन असलेल्या या बॅगची किंमत $1,790 डॉलर (1.4 लाख रुपये) आहे. इतकी महाग पिशवी कोण विकत घेणार..?

जगातील सर्वात महाग 'ट्रॅश बॅग'
हे चमकदार 'ट्रॅश पाउच' निळा, पिवळा, काळा आणि पांढऱ्या रंगात उपलब्धत आहे. या पिशवीच्या समोरच्या बाजुस Balenciaga चा लोगो आहे. ही बॅग गाई/म्हशीच्या चमड्यापासून बनवण्यात आली आहे. बॅगबाबत सांगताना Balenciaga ची क्रिएटिव्ह डायरेक्टर Demna Gvasalia ने Women's Wear Daily ला सांगितले की, 'जगातील सर्वात महाग कचऱ्याची पिशवी तयार करण्याची कल्पना डोक्यात आली, म्हणूनच ही पिशवी तयार केली. ही संधी मी सोडू शकत नव्हते.'

नेटकऱ्यांनी घेतली मजा
ही आयडिया कितीही यूनिक वाटली, तरीदेखील सोशल मीडियावर याला ट्रोल केले जात आहे. अनेकांनी याला वाईट आयडिया म्हटले, तर काहींनी टीकाही केली. जगात अनेकांकडे पोट भरायला जेवण उपलब्ध नाही आणि हे लोक महाग कचऱ्याची पिशवी तयार करत आहेत, असे एकाने म्हटले.


 

Web Title: Balenciaga trash pouch: Fashion house Balenciaga launched an expensive trash bag; worth Rs 1.4 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.