या देशात समोसा खाल्ला तर मिळणार शिक्षा, कारण वाचून डोकं चक्रावून जाईल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:58 AM2022-12-15T09:58:54+5:302022-12-15T10:00:52+5:30
Viral Trending News: कधी कधी भूक भागवण्यासाठीही लोक समोसा खातात. तरी सुद्धा एका देशात समोसा खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्याचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल.
Viral Trending News: भारतातील जास्तीत जास्त लोकांनी समोसा तर नक्कीच खाल्ला असेल. तुम्हाला माहीत नसेल पण, समोसा केवळ भारतातच नाही तर यूरोपियन देशांमध्येही भरपूर खाल्ला जातो. समोसा भारतात कुठेही सहजपणे मिळतो. आपल्या शेजारील देशातही समोसा आवडीने खाल्ला जातो. बरेच लोक समोसा चहासोबत खाणं पसंत करतात तर काही लोक याला सायंकाळी नाश्त्यात खातात. कधी कधी भूक भागवण्यासाठीही लोक समोसा खातात. तरी सुद्धा एका देशात समोसा खाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ज्याचं कारण वाचून तुम्ही हैराण व्हाल.
अनेक देशांमध्ये आवडीने खाल्ला जाणारा समोसा आफ्रिकन देश सोमालियामध्ये बॅन आहे. इथे जर कुणी समोसा खरेदी करताना, खाताना किंवा तयार करताना दिसला तर त्यांना कायदेशीर शिक्षा होऊ शकते. असं सांगितलं जात आहे की, एका धार्मिक संघटनेने यावर बंदी घातली आहे. या संघटनेचं मत आहे की, समोस्याचा त्रिकोणी आकार क्रिश्चियन कम्यूनिटीच्या एका चिन्हासोबत मिळता-जुळता आहे. याच कारणाने सोमालियात समोस्यावर बंदी घालण्यात आली आहे. याउलट काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, समोस्यात सडलेलं मांस भरलं जात होतं. त्यामुळे यावर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान काही लोकांचं मत आहे की, समोस्याची भारतात एंट्री मध्ये आशियामधून झाली होती. याच्या रेसिपीचं श्रेय आशियातील अरबी व्यापाऱ्यांना दिलं जातं. 13व्या शतकातील पुस्तक 'तारीख ए बेहाकी' मध्ये याबाबत सांगण्यात आलं आहे. तेच काही लोक समोसा हा इजिप्तचा असल्याचं सांगतात. मुघल काळात हे मुघल दरबाराची शान असायचे.