केळ वाकडंच का असतं? जाणून घ्या याच्या आकारामागचं वैज्ञानिक कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 09:26 AM2023-04-22T09:26:24+5:302023-04-22T09:27:05+5:30
केळी तुम्ही अनेकदा खाल्ली असतील पण कधी याचा विचार केलाय का की, याचा आकार सरळ का नसतो? यामागे एक मोठं वैज्ञानिक कारण आहे. चला याबाबत जाणून घेऊ...
केळ एक असं फळ आहे जे वर्षातले बाराही महिने खायला मिळतं. भरपूर एनर्जी देणाऱ्या केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं. यामुळे पचनक्रिया मजबूत राहते. सोबतच केळी फार महागही नसतात. काही लोक केळी अशीच खातात तर काही शेक बनवून सेवन करतात. केळी तुम्ही अनेकदा खाल्ली असतील पण कधी याचा विचार केलाय का की, याचा आकार सरळ का नसतो? यामागे एक मोठं वैज्ञानिक कारण आहे. चला याबाबत जाणून घेऊ...
सुरूवातीला सरळ असतो आकार
मुळात जेव्हा झाडावर केळी लागणं सुरू होतात तेव्हा त्या गुच्छ्याच्या रूपात असतात. हळूहळू हा गुच्छा वाढत जातो आणि जमिनीकडे लटकतो तोपर्यंत केळींचा आकार सरळच असतो. पण विज्ञानात Negative Geotropism नावाच्या झाडाच्या एका प्रवृत्तीबाबत उल्लेख केला आहे. या प्रवृत्तीमुळे झाड किंवा त्यावरील फळं थोडे मोठे झाले की, ते सूर्याकडे वाढणं सुरू होतात. हीच बाब केळींसोबत होते. ज्याच्या प्रभावामुळे केळी हळूहळू वाकडे होऊन वरच्या दिशेने येतात. यामुळेच केळींचा आकार वाकडा होणं सुरू होतं.
काय आहे कारण
वनस्पती वैज्ञानिकांनुसार, जगात केळीचं झाड सगळ्यातआधी रेन फॉरेस्टमध्ये लागलं होतं. त्या जंगलांमध्ये सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नव्हता. ज्यामुळे केळींच्या सुरूवातीच्या झाडांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी वरच्या दिशेने वाढावं लागलं. याचा प्रभाव त्यांच्या आकारावर पडला आणि केळीचा आकार वाकडा झाला. नंतर जिथे जिथे केळीची झाडे लावण्यात आली. तिथे तिथे ही प्रवृत्ती त्यांच्यासोबत वाढत गेली. हेच कारण आहे की, आपल्याला केळींचा आकार वाकडा दिसतो.
मलेशियाच्या रेन फॉरेस्टमध्ये झाली होती उत्पत्ती
केळींची उत्पत्ती कधी आणि कुठे झाली होती याबाबत कुणाकडेही ठोस अशी माहिती नाही. पण अशी मान्यता आहे की, साधारण 4 हजार वर्षाआधी मलेशियातील रेन फॉरेस्टमध्ये केळीची झाडे लागली होती. त्यानंतर जंगलात गेलेल्या मानवांना केळीबाबत समजलं तेव्हा हे फळ आणि त्याची झाडं जगभरात पसरली. आता हे फळ भारत मलेशियासही जगातल्या साधारण दिडशे देशांमध्ये आढळतं.