देवासाठी काय पण! 2 कोटी किमतीच्या नोटांनी सजवलं गणपती मंदिर; 50 लाखांची वापरली नाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 03:00 PM2023-09-18T15:00:02+5:302023-09-18T15:21:21+5:30
गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बंगळुरूमधील सत्य साई गणपती मंदिर चलनी नोटांनी सजवण्यात आलं असून सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
बंगळुरूच्या पुत्तेनाहली येथील सत्य साई गणपती मंदिरात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने नोटांची आकर्षक सजवण्यात आली आहे, जी खूपच जास्त सुंदर दिसते. दरवर्षी मंदिर विविध वस्तूंनी सजवलं जातं. यावेळी ही गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बंगळुरूमधील सत्य साई गणपती मंदिर चलनी नोटांनी सजवण्यात आलं असून सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
मंदिराच्या सजावटीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या नोटा आणि 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची नाणी वापरण्यात आली आहेत. यामध्ये 10, 20, 50, 100, 200, 500 रुपयांच्या नोटा वापरण्यात आल्या आहेत. मंदिरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परिसरात जवळपास 22 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून गनमॅन सतत लक्ष ठेवून आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 150 स्वयंसेवक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून मंदिराची सजावट केली. ते तयार करण्यासाठी तीन महिने लागले. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान सत्य साई गणपती मंदिराची विविध प्रकारे सजावट केली जाते. यावेळी हटके सजावट पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.