ज्या मुलीचं बालपणापासून संगोपन करतो पिता, ती तरूण होताच बनतो तिचा पती!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:19 PM2024-11-21T14:19:33+5:302024-11-21T14:20:50+5:30
Weird Marriage Rituals : आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते.
Weird Marriage Rituals : जगभरात वेगवेगळ्या जमाती आहेत. काही जंगलांमध्ये राहतात तर काही गाव-शहरांमध्ये राहतात. या जमाती इतर लोकांपासून फार वेगळ्या असतात. त्यांच्या प्रथा, रितीरिजाव, राहणीमान सगळंच वेगळं असतं. त्यांच्या या प्रथा वेगवेगळ्यांनी कारणांनी चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच जमातीबाबत आणि त्यांच्या कुप्रथेबाबत सांगणार आहोत. ज्याबाबत वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. ही जमात बांगलादेशमध्ये राहते.
बांगलादेशातील मंडी जमातीबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत. या जमातीमध्ये एक अजब प्रथा आहे. जेव्हा एखादा पुरूष कमी वयात विधवा झालेल्या महिलेसोबत लग्न करतो, तेव्हा हेही ठरवलं जातं की, त्या महिलेच्या मुलीसोबत तो पुढे जाऊन लग्न करेल. महिलेला पहिल्या लग्नातून झालेल्या मुलीसोबत हे लग्न केलं जातं. बालपणी ती मुलगी ज्या व्यक्तीला बाबा म्हणून हाक मारते, पुढे जाऊन तिच व्यक्ती तिचा पती बनते. ही कुप्रथा आजही सुरू आहे.
सावत्र वडिलांसोबत लग्न
या कुप्रथेसाठी वडील सावत्र असणं गरजेचं असतं. या कुप्रथेची सुरूवात तेव्हा होते जेव्हा एखादी महिला कमी वयातच विधवा होते. त्यानंतर दुसरा पुरूष तिच्यासोबत याच अटीवर लग्न करतो की, पहिल्या लग्नातून झालेल्या तिच्या मुलीसोबत तो पुढे जाऊन लग्न करेल. यामागचं लॉजिक असं सांगितलं जातं की, कमी वयाचा पती आपली पत्ननी आणि मुलगी दोघींचं जास्त काळ संरक्षण करू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे आजही ही कुप्रथा इथे सुरू आहे.
अनेक मुलींचं जीवन उद्ध्वस्त
या कुप्रथेमुळे मंडी जमातीतील अनेक मुलींचं जीव उद्ध्वस्त झालं आहे. आपली कहाणी सांगत मंडी जमातीतील ओरोलाने बरेच धक्कादायक खुलासे केले होते. तिने सांगितलं होतं की, जेव्हा ती खूप लहान होती, तेव्हा वडिलांना गमावलं होतं. त्यानंतर आईने नॉटेन नावाच्या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलं. ओरोलाला तिचे दुसरी वडील पसंत होते. तोही तिची खूप काळजी घेत होता. मात्र जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिला अशी गोष्ट समजली जी ऐकून तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिला समजलं की, जेव्हा ती तीन वर्षांची होती तेव्हाच तिचं लग्न नॉटेन नावाच्या व्यक्तीसोबत लावण्यात आलं होतं. तोच तिचा वडील होता. अशा अनेक मुलींचं जीवन उद्ध्वस्त झालंय.