२० वर्षांपासून महिलेच्या पोटात वेदना होत राहिल्या, एक्स-रे पाहून महिलेसोबत डॉक्टरही झाले हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 04:05 PM2022-01-17T16:05:14+5:302022-01-17T16:12:01+5:30
बराच काळ त्यांच्या वेदना कमी झाल्या नाही. तेव्हा त्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेल्या. जास्तीत जास्त डॉक्टर त्यांना औषधं देत होते आणि अनेकांना तर पोट दुखण्याचं कारणंच समजलं नाही.
मनुष्याचं शरीर हे फारच अद्बूत असतं. अनेकदा यात अशा गोष्टी बघायला मिळतात ज्या कुणालाही हैराण करून सोडतात. पण प्रत्येकवेळी या गोष्टी नैसर्गिकच नसतात. अनेकदा डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागतो. बांग्लादेशातील (Bangladesh) एका महिलेसोबत असंच झालं. तिला गेल्या २० वर्षांपासून पोटात दुखत होतं. मग जेव्हा तिचं चेकअप केलं तर डॉक्टरही हैराण झाले.
बांग्लादेशची राहणारी ५५ वर्षीय बचेना खातून सध्या चर्चेत आहे. बचेना यांच्या पोटात २० वर्षांपासून जोरात वेदना होत होत्या. असं समजलं की, त्यांनी २००२ साली बांग्लादेशमध्ये चौंदगामध्ये गॉल ब्लॅडरच्या स्टोनचं ऑपरेशन केलं होतं. महिलेने तिच्या या ऑपरेशनसाठी आयुष्यभराची कमाई दिली होती. पण हॉस्पिटलमधून निघाल्यावर साधारण २ दिवसांनी तिला पोटात वेदना होऊ लागल्या होत्या. जेव्हा ती पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेली तर त्यांनी सांगितलं की, लक्ष देऊ नका, ऑपरेशननंतर असं होतं.
२० वर्ष पोटात वेदना होत राहिल्या
बराच काळ त्यांच्या वेदना कमी झाल्या नाही. तेव्हा त्या वेगवेगळ्या डॉक्टरांकडे गेल्या. जास्तीत जास्त डॉक्टर त्यांना औषधं देत होते आणि अनेकांना तर पोट दुखण्याचं कारणंच समजलं नाही. या नादात बचेना यांना गाय, संपत्ती विकावी लागली. त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. २० वर्ष त्या हे दुखणं सहन करत राहिल्या. मग त्या आणखी एका डॉक्टरकडे गेल्या आणि त्याने त्यांना एक्स-रे काढण्यास सांगितलं.
एक्स-रे पाहून बसला धक्का
एक्स-रे मध्ये दिसलं ते फार हैराण करणारं होतं. बचेना यांच्या एक्स-रेमध्ये एका कात्री दिसली. ही कात्री गेल्या २० वर्षांपासून त्यांच्या पोटात होती. ही कात्री बघून डॉक्टरही हैराण झाले. जेव्हा त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या २० वर्षाआधीच्या ऑपरेशनबाबत सांगितलं तेव्हा हे समजलं की, डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे हे झालं. गेल्या सोमवारी त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांच्या शरीरातून कात्री काढण्यात आली. आता त्या रिकव्हर होत आहेत. आता त्याच हॉस्पिटलमध्ये तीन लोकांची कमेटी नेमली गेली. जे जाणून घेत आहेत की, महिलेच्या शरीरात कात्री राहिली कशी?
हे पण वाचा :
भारताचे पहिले आर्मी चीफ ज्यांना पंतप्रधान पंडित नेहरू खूप घाबरायचे, कारण...