आवडीचं चॉकलेट खाण्यासाठी बॉर्डर क्रॉस करून रोज भारतात येत होता मुलगा, जवानांनी पकडलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 12:17 PM2022-04-18T12:17:37+5:302022-04-18T12:17:57+5:30
Jarahatke : पीटीआयसोबत बोलताना सोनामुरा SDPO ने सांगितलं की, कोर्टाने त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. चौकशी दरम्यान मुलाने भारतात येण्याचं कारण सांगितलं, जे फारच मजेदार आहे.
Jarahatke : काही घटना अशा असतात ज्यांवर सहजासहजी विश्वास ठेवणं अवघड असतं. अशीच एक घटना समोर आली आहे. त्रिपुराच्या सिपाहिजाला जिल्ह्यात एका मुलाला सेनेच्या जवानांनी पकडलं. या मुलाचं नाव इमाम होसैन होतं आणि तो विना कागदपत्र भारताच्या सीमेत घुसला होता. सेनेच्या जवानांनी चौकशी दरम्यान मुलाला भारतात येण्याचं कारण विचारलं, तर त्याने अजब कारण सांगितलं.
सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' सिनेमा तुम्ही पाहिला असेलच. ज्यात तुम्ही बघितलं की सीमेवर असलेल्या तारांच्या कुंपणाखालून लोक पाकिस्तानात एन्ट्री घेतात. त्याचप्रमाणे एक मुलगा तारांच्या खालून नदी पार करत भारतात येत होता. मजेदार बाब म्हणजे चौकशी दरम्यान त्याने सांगितलं की तो पहिल्यांदा नाही आलाय. हे तर त्याचं रोजचं काम आहे.
बांग्लादेशमध्ये राहणारा ईमान होसैनने सांगितलं की, तो रोज भारतात येत होता. यासाठी तो तारांच्या मधळ्या गपमधून बाहेर येऊन छोटी नदी पार करत होता आणि नदीत पोहून तो त्रिपुराच्या कलामचौरा गावात येत होता. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसने त्याला अटक केली आणि स्थानिक पोलिसांकडे सोपवलं. पीटीआयसोबत बोलताना सोनामुरा SDPO ने सांगितलं की, कोर्टाने त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. चौकशी दरम्यान मुलाने भारतात येण्याचं कारण सांगितलं, जे फारच मजेदार आहे.
ईनामची पोलिसांनी चौकशी केली तर समजलं की, तो बांग्लादेशातील कोमिला जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याने स्वत: सांगितलं की तो बांग्लादेशातून रोज नदी पार करत भारतात आपल्या आवडीचं चॉकलेट घेण्यासाठी येत होता. पोलिसांनी त्याच्याकडे बांग्लादेशी करन्सीही मिळाली. पण कोणतीही दुसरी संशयास्पद वस्तू मिळाली नाही. त्याला केवळ विना कागदपत्र भारतात येण्यासाठी पकडण्यात आलं. प्रकरणाची चौकशी सरू आहे आणि मुलाच्या परिवारासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका स्थानिक दुकानदाराने सांगितलं की केवळ हाच मुलगा नाही तर आणखीही काही मुलं नदीच्या मार्गे चॉकलेट आणि इतर वस्तू घेण्यासाठी भारतात येतात.