या पक्षानं तब्बल २३९ तास उडत केला १३ हजार किलोमीटरचा प्रवास, तोही एकही क्षण न थांबता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 07:17 PM2021-10-31T19:17:43+5:302021-10-31T19:20:53+5:30
एका पक्षाचा किस्सा समोर आला आहे. यात या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे.
एका पक्षाचा किस्सा समोर आला आहे. यात या पक्षाने २३९ तासात १३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. विशेष बाब म्हणजे या पक्षानं इतकं मोठं अंतर न थांबता म्हणजेच ब्रेक न घेता पार केलं आहे. आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी ही पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं, की एका Bar-tailed Godwit ने न थांबता आणि आराम न करता १३ हजार किलोमीटर प्रवास केला.
या पक्षाने अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा प्रवास केला. आपल्या या जिद्दीसोबतच पक्षाने स्वतःच्या नावे रेकॉर्ड नोंदवला आहे, कारण याआधी इतक्या दूरपर्यंत न थांबता कोणत्याही पक्षाने प्रवास केलेला नाही. या पक्षाचे फोटो Geoff White/Adrien Riegen ने कॅप्चर केले आहेत.
A Bar-tailed Godwit started its journey of 13000 kms from Alaska to Australia and completed it in 239 hours without taking rest, setting the world record for the longest continual flight by any land bird by distance.
— Ramesh Pandey (@rameshpandeyifs) October 28, 2021
An incredible journey.
PC: Geoff White/Adrien Riegen pic.twitter.com/G5JpxJ6u4z
या पक्षाची ही जिद्द आणि मेहनत पाहून सगळेच हैराण झाले आहेत. एका यूजरनं या पक्षाचं कौतुक करत लिहिलं, माहिती नव्हतं की पक्षी आराम न करता इतकं अंतर कापू शकतात आणि सलग उडू शकतात. याशिवाय इतरही अनेकांनी या पोस्टवर कमेंट करत पक्षाचं कौतुक केलं आहे.