सावधान ! ओरल सेक्समुळे तुम्हाला होऊ शकतो हा रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2017 04:33 PM2017-07-07T16:33:30+5:302017-07-07T16:37:48+5:30
ओरल सेक्स केल्यानं भयंकर असा गोनोरिया नावाचा जंतूसंसर्ग(असुरक्षित सेक्समुळे होणारे संसर्ग) उद्भवतो. अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - ओरल सेक्स केल्यानं भयंकर असा गोनोरिया नावाचा जंतूसंसर्ग(असुरक्षित सेक्समुळे होणारे संसर्ग) उद्भवतो. महत्त्वाचे म्हणजे कंडोम न वापरल्यानं हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती आहे, अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिली आहे.
""बीबीसी""नं दिलेल्या माहितीनुसार, जर एखादा व्यकी गोनोरिया संसर्गास बळी पडला तर यावर उपचार करणं कठीण आहे. कारण अनेक प्रकरणांमध्ये या संसर्गावर उपाय नसल्याची माहिती आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) दिला आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, प्रत्येक वर्षी 7.8 कोटी लोकं गंभीर स्वरुपातील लैंगिक संसर्गाला बळी पडतात आणि याचा थेट परिणाम प्रजनन क्षमतेवर होत असल्याचं निदर्शनास आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 77 देशांतील आकडेवारीचं विश्लेषण केले. यावरुन त्यांना अशी माहिती मिळाली की, गोनोरियाविरोधात प्रतिकार करणं औषधांसाठी सोपे नाही.
त्यांनी असेही सांगितले की, गोनोरिया एक असा जंतू आहे, ज्यावर औषधांचा काहीही परिणाम होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टर टिओडोर व्हाय यांनी सांगितले की, यातील जपान, फ्रान्स आणि स्पेन असे देश आहेत की जेथे या रोगावर कोणत्याही प्रकारचा उपाय नाही.
ओरल सेक्स
गोनोरियामुळे गुप्तांग, गुदद्वार आणि घशाला संसर्ग होऊ शकतो. मात्र पुढे याबाबत चिंता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जर घशातील सामान्य खवखव ठीक करण्यासाठी तुम्ही औषधं घेतली तर ती नायशेरिया प्रजातींसोबत मिसळतात व प्रतिकार करतात. मात्र, ओरल सेक्सद्वारे गोनोरिया जंतूंचा हल्ला होतो आणि यामुळे भयंकर गोनोरिया पसरण्याची भीती असते.
काय आहे गोनोरिया ?
गोनोरिया हा संसर्ग रोग असुरक्षित योनी, गुदद्वार आणि ओरल सेक्समुळे पसरतो. 10 पैकी एक हेट्रोसेक्शुअल पुरुष, 75 टक्के महिला आणि गे पुरुषांना या संसर्गाची लागण होते. मात्र या रोगाची लक्षणं सहजरित्या ओळखता येत नाही.
मात्र, या संसर्गाची लागण झाल्यास लघवी करताना व मासिक पाळीदरम्यान वेदना होणे या लक्षणांद्वारे ओळख पटवता येऊ शकते. या संसर्गावर उपाय होणं शक्य नसल्याने याचा प्रजनन क्षमतेवर थेट परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.