घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 12:49 PM2024-01-19T12:49:54+5:302024-01-19T12:50:24+5:30

अनेकदा आपण सगळेच काही वस्तूंना फार सामान्य समजतो, पण त्याच वस्तू मोठ्या कामाच्या निघतात.

Beautiful pottery at home turned out to be a pricey antique worth lakhs | घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

घरातील भांड्यामध्ये ठेवलेला हा सामान्य पॉट निघाला मौल्यवान, मालक झाला मालामाल

जुन्या काळातील लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू लपवून ठेवत होते. ते या वस्तू अशा ठिकाणी लपवत होते ज्या त्यांच्या मृत्यूनंतर रहस्य बनूनच राहतात. काही वस्तू तर अशा असतात ज्या डोळ्यांसमोरच असतात, पण तरीही त्यांची किंमत कळत नाही. अशात जेव्हा त्यांचं सत्य समोर येतं तेव्हा अनेकदा लोकांचं नशीब चमकतं.

अनेकदा आपण सगळेच काही वस्तूंना फार सामान्य समजतो, पण त्याच वस्तू मोठ्या कामाच्या निघतात. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. त्याच्या घरात ठेवलेल्या एका जुन्या चिनीमातीच्या भांड्याने त्याला मालामाल केलं. त्याला जराही कल्पना नव्हती की, त्याच्या घरात ठेवलेलं हे जुनं भांडं फार मौल्यवान आहे. हा जुना सिरॅमिक पॉट म्हणून त्याने तो ठेवला होता. 

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका परिवाराकडे हा पॉट ठेवला होता. त्याचं झाकणही हरवलेलं होतं. बॅनबरीच्या Hanson Holloway’s Auctioneers च्या पॉल फॉक्सने सांगितलं की, जेव्हा या पॉटवरील निळा रंग पाहिला तेव्हा समजलं की, ही वस्तू मौल्यवान आहे. याचा अभ्यास केल्यावर समजलं की, हा पॉट चीनमधील राजा कांग्शीच्या काळात बनवण्यात आला होता.

300 वर्ष जुना निघाला पॉट

हा पॉट 1661 ते 1722 दरम्यानचा बनवला होता आणि 17व्या शतकात या पॉटची किंमत लिलावात $1,200 से $1,900 म्हणजे साधारण 1 लाख 57 हजार रूपयांपेक्षा जास्त लावण्यात आली. पॉल फॉक्सने फार्महाउस फाइंडिंगला सांगितलं की, चीनच्या कल्चरमध्ये अशा निळ्या रंगांच्या पॉट्सचं खूप महत्व आहे. हा निळा रंग प्रगतीचा प्रतीक आहे. 

Web Title: Beautiful pottery at home turned out to be a pricey antique worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.