बाबो! बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 16:55 IST2019-05-16T16:45:32+5:302019-05-16T16:55:42+5:30
सामान्यपणे आपण बघतो की, कोणत्याही शहरात हॉस्पिटल, शाळा, प्रार्थना स्थळ आणि पोलीस स्टेशनसारख्या सुविधा असतात.

बाबो! बिल्डींग आहे की शहर; हॉस्पिटल, शाळा, चर्च आणि पोलीस स्टेशनही आतच!
सामान्यपणे आपण बघतो की, कोणत्याही शहरात हॉस्पिटल, शाळा, प्रार्थना स्थळ आणि पोलीस स्टेशनसारख्या सुविधा असतात. या गोष्टींमुळे त्या ठिकाणाला शहराचा रूप मिळतं. पण तुम्ही कधी अशा शहराबाबत ऐकलंय का? जे एका इमारतीत वसलं आहे. कदाचित तुम्ही असं पाहिलं आणि ऐकलंही नसेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशाच एका शहराबाबत सांगणार आहोत. जे एका इमारतीत वसलं आहे आणि महत्त्वाची बाब म्हणजे यात सुविधांची अजिबात कमतरता नाहीये.
(Photo Credit : Social Media)
अमेरिकेतील उत्तर भागातील राज्य अलास्कामध्ये एक छोटा परिसर आहे व्हिटिअर. हे ठिकाण आपल्या वसाहती आणि व्यवस्थेसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. या परिसरात एक १४ मजल्यांची इमारत आहेत. या इमारतीचं नाव 'बेगिच टॉवर' आहे. या ठिकाणाला व्हर्टिकल टाऊनही म्हटलं जातं.
या एकमेव इमारतीत २०० परिवार राहतात. या इमारतीची खासियत म्हणजे यात केवळ लोक राहतात असे नाही तर त्यांच्या आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार सर्व गोष्टींच्या इथे सुविधा आहेत. या इमारतीत पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र, स्टोर्स, लॉन्ड्री आणि चर्च हे सगळं आहे.
(Image Credit : Anchorage Daily News)
या इमारतीत काम करणारे सर्व कर्मचारी आणि इमारतीचा मालक याच इमारतीत राहतो. त्यामुळेच या इमारतीत इतर इमारतींच्या तुलनेत अधिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
(Image Credit : Anchorage Daily News)
शीतयुद्धावेळी ही इमारत सैनिक बराक म्हणूण वापरत होते. पण नंतर इथे लोक राहू लागले. इथे राहणाऱ्या लोकांची जीवनशैली इतर ठिकाणी राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत फार वेगळी आहे. या परिसरातील वातावरणही नेहमीच फार खराब असतं, त्यामुळे हे लोक फार जास्त बाहेर जाऊ-येऊ शकत नाहीत.