पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 02:54 PM2021-12-02T14:54:38+5:302021-12-02T14:55:35+5:30

Bengaluru : टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मनोज आणि स्वाती ( बदललेली नावे)चं २००९ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही इंग्लंडला गेले.

Bengaluru : Husband demand divorce due to wife's hygiene habits | पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी

पत्नीने सफाईच्या नावाखाली धुतला लॅपटॉप आणि मोबाइल फोन, वैतागलेल्या पतीकडून घटस्फोटाची मागणी

Next

ऑब्सेसिव्ह कंपल्सिव डिसॉर्डर हा एक असा मानसिक आजार आहे ज्यात रूग्ण एखादं काम भिती किंवा सनकीपणामुळे पुन्हा पुन्हा करतो. असं म्हटलं जातं की, बंगळुरूतून (Bengaluru) समोर आलेली घटनाही ओसीडीशी निगडीतच आहे. इथे एका पतीने पत्नीच्या सफाईच्या सवयीला कंटाळून घटस्फोट मागितला आहे. तेच पत्नीही तिच्या वागण्याला असामान्य म्हटल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचा विचार करत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, मनोज आणि स्वाती ( बदललेली नावे)चं २००९ मध्ये लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही इंग्लंडला गेले. कारण पतीची तिथे नोकरी होती. आतापर्यंत सगळं काही ठीक सुरू होतं. कपलची केस बघणाऱ्या सिटी पोलिसमधील सीनिअर काउंसल बीएस सरस्वती म्हणाल्या की 'दोन वर्षाने पहिलं बाळ जन्माला आल्यानंतर स्थिती बिघडू लागली. कामाहून परत आल्यावर पत्नी प्रत्येकवेळी शूज, कपडे, सेलफोनची सफाईसाठी करण्यासाठी पतीला भाग पाडत होती. ज्यामुळे तो वैतागला'. ब्रिटनहून परतल्यावर कपलने फॅमिली काउन्सेलिंगचा आधार घेतला आणि स्थिती सुधारू लागली होती. त्यानंतर कपलने आणखी एका बाळाला जन्म दिला.

रिपोर्ट्सनुसार, कोविडमुळे स्वातीची ओडीसी आणखी बिघडली आणि तिने घरातील प्रत्येक वस्तू धुवायला आणि सॅनिटाइज करायला सुरूवात केली. सरस्वती म्हणाल्या की, 'लॉकडॉऊन दरम्यान पती घरातूनच काम करत होता आणि पत्नीने त्याचा लॅपटॉप आणि सेलफोन धुवून काढला. आपल्या तक्रारीत पती म्हणाला की, ती दिवसातून सहा पेक्षा जास्त वेळा आंघोळ करते आणि आंघोळीचा साबण साफ करण्यासाठीही एक वेगळा साबण वापरते'.

दीर्घ आजारानंतर गेल्यावर्षी स्वातीच्या आईचं निधन झालं होतं. ज्यानंतर तिने पती आणि मुलांना जबरदस्ती घराबाहेर ठेवलं. त्यानंतर तीन दिवस घराची सफाई केली. काउन्सलर म्हणाले की, 'पतीनंतर आता स्वाती मुलांनाही घरी आल्यावर रोज यूनिफॉर्म आणि शूज धुण्यासाठी भाग पाडत होती. यानंतर वैतागून पती मुलांना घेऊन आपल्या आई-वडिलांकडे गेला. तर पत्नी पोलीस घेऊन तिथे आली'. 
 

Web Title: Bengaluru : Husband demand divorce due to wife's hygiene habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.