महिन्याला ७ लाख पगार, बंगळुरूच्या कपलला लागली चिंता; इतके पैसे खर्च कुठे करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 02:09 PM2024-06-19T14:09:59+5:302024-06-19T14:10:35+5:30
सोशल मीडियात अनेकदा अशा गोष्टी व्हायरल होतात ज्यामुळे अनेकांना विचार करण्यास भाग पाडलं जातं. नुकतेच बंगळुरूतील एका कपलनं त्यांना भेडसावणाऱ्या समस्येवर लोकांकडून सल्ला मागितला आहे
आयुष्य मौजमज्जेत आणि ऐशोआरामात जगण्यासाठी पैसा गरजेचे असतो. परंतु अलीकडेच बंगळुरूतील एका कपलला आलेल्या अनोख्या अडचणीमुळे सर्वत्र चर्चा होत आहे. हे कपल टेक्निकल एक्सपर्ट आहेत. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, परंतु हा पैसा कुठे आणि कसा खर्च करायचा हेच कळत नाही. त्यामुळे या कपलनं सोशल मीडियात लोकांची मदत मागितली आहे.
बंगळुरूत राहणाऱ्या या व्यक्तीनं सोशल मीडियात पोस्ट करत म्हटलंय की, मी आणि माझी बायको दोघं मिळून महिन्याला ७ लाख रुपये कमावतो. परंतु या पैसा कसा खर्च करायचा हे आम्हाला कळत नाही. बऱ्याचदा बिनधास्त पैसे खर्च करूनही त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहतात असं त्यांनी सांगितलं आहे.
सोशल मीडिया X वर ग्रेपवाइनचे को फाऊंडरने याचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यात यूझर्सचे भन्नाट रिप्लायही येत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतेय. एक काळ असा होता, जेव्हा फक्त बिझनेसमॅन व्यक्तींना अशा समस्या येत होत्या. परंतु आता ३० वर्षाच्या लोकांनाही श्रीमंतांना उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे असं पोस्टवर लिहिलंय.
This is awesome 💪
— Saumil Heard It (@OnTheGrapevine) June 15, 2024
Once upon a time it was only Indian Businessmen who would run into problems of excess
But today we’re seeing even some regular 30 year olds in the service class facing proper rich people problems :)
193 comments: https://t.co/AZM1tXEknHpic.twitter.com/NbrpNTvYkm
व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये काय आहे?
हे दोघं पती-पत्नी बंगळुरूत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांनी लिहिलंय की, आम्हाला अपत्य नाही. मासिक कमाई ७ लाख रुपये आणि त्यात वार्षिक बोनसही समाविष्ट आहे. त्यातील २ लाख रुपये Mutual Fund मध्ये गुंतवणूक करतो. सर्व मिळून दर महिन्याचा खर्च १.५० लाख रुपये आहे. बंगळुरूमध्ये एका चांगल्या सोसायटीत राहतो. कार आहे, खर्च करण्याआधी विचार करत नाही. इतकं असूनही बँक खात्यात ३ लाख शिल्लक राहतात. हे पैसे कसे खर्च करायचे माहिती नाही. आम्ही दोघेही फारसे शौकिन नाही जिथे आम्ही पैसे खर्च करू. त्यामुळे आम्हाला अधिक कमवण्याची लाससाही नाही. त्यामुळे यावर उपाय सांगा असा सल्ला त्याने लोकांना विचारला आहे. आतापर्यंत ही पोस्ट १ लाख ३५ हजार लोकांनी पाहिले आहे.