काळ्या जादूने एक्स बॉयफ्रेंडला वश करण्यासाठी तरूणीने गमावले लाखो रूपये
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 05:11 PM2024-01-23T17:11:32+5:302024-01-23T17:11:53+5:30
आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरूणी बिथरली होती. तेव्हा तिला अहमद नावाच्या एका बाबाची माहिती मिळाली.
असं म्हटलं जातं की, प्रेमात काही गैर नसतं. पण एका तरूणीला तिच्या जुन्या बॉयफ्रेंडला आपल्याकडे आकर्षित करणं महागात पडलं. बंगळुरूच्या 25 वर्षीय तरूणीला वाटत होतं की, तिचा आधीचा प्रियकर तिच्याकडे परत यावा. पण तिला हे नव्हतं माहीत की, तिला यासाठी 8.20 लाख रूपये गमवावे लागतील.
मीडिया रिपोर्टनुसार, आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरूणी बिथरली होती. तेव्हा तिला अहमद नावाच्या एका बाबाची माहिती मिळाली. तरूणीने अहमदला ऑनलाईन कॉन्टॅक्ट केला त्याने सांगितलं की, तरूणी, तिचे मित्र आणि परिवारावर काळी जादू करण्यात आली आहे. ज्यामुळे तिला जीवनात समस्या येत आहेत. यावर त्याने काही उपाय सांगितले. ज्यासाठी त्याने तिच्याकडे 501 रूपये मागितले.
तरूणी त्याला पैसे ऑनलाईन पाठवले, ज्यानंतर अहमदने तरूणीकडे तिचे, परिवारातील लोकांचे आणि मित्रांचे फोटो मागितले. यानंतर अहमदने तरूणीला सांगितलं की, जर तिने 2.4 लाख रूपये दिले तर तो तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या परिवारावर काळी जादू करू शकतो. यानंतर कुणीही तिच्या नात्याविरोधात जाणार नाही.
तरूणी अहमदच्या बोलण्यात आली आहे आणि 22 डिसेंबरला त्याला 2.4 लाख रूपये रोख दिले. काही दिवसांनी अहमदने तिला आणखी 1.7 लाक रूपये मागितले. यावर तरूणीला संशय आला आणि तिने अहमदला पैसे देण्यास नकार दिला.
यावर अहमजने तरूणीला धमकावणं सुरू केलं की, तो तिचे आई-वडील, तिचा एक्स बॉयफ्रेंड सगळ्यांचे फोटो शेअर करेल. तरूणी यामुळे घाबरली आणि तिने त्याला आणखी 4.1 लाख रूपये दिले.
तरूणीसोबत झालेल्या या फसवणुकीची माहिती तिच्या आई-वडिलांनाही लागली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांना चौकशीदरम्यान समजलं की, हे सगळे पैसे अहमदने त्याचा साथीदार लियाखातुल्लाच्या खात्यात ट्रांसफर करायला सांगितले होते. अहमद म्हणाला की, तरूणीने काळी जादू करण्यासाठी त्याला भाग पाडलं आणि तो लवकर तिचे पैसेही परत करेल. सध्या या घटनेची चौकशी सुरू आहे.