बेवफा चायवाला! प्रेमात धोका मिळताच उघडलं 'चहाचं दुकान'; ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:07 PM2022-11-16T15:07:09+5:302022-11-16T15:14:56+5:30

दुकानाला बेवफा चायवाला नाव देण्याचं कारण विचारल्यावर तो आपल्या मनाची अवस्था सांगू लागतो.

bewafa chai wala tea stall in banda after breakup special offer for lovers | बेवफा चायवाला! प्रेमात धोका मिळताच उघडलं 'चहाचं दुकान'; ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर

बेवफा चायवाला! प्रेमात धोका मिळताच उघडलं 'चहाचं दुकान'; ब्रेकअप झालेल्यांसाठी खास ऑफर

googlenewsNext

प्रेमात धोका मिळाल्यानंतर एका तरुणाने 'बेवफा चायवाला' अशा नावाने चहाचं दुकान सुरू केलं आहे. दुकानाबाबत विचारल्यानंतर या तरुणाने "तो पदवीधर आहे आणि नोकरी न मिळाल्याने त्याने देशाच्या पंतप्रधानांचे अनुकरण करत चहाचे दुकान उघडले आहे" असं म्हटलं आहे. आपल्या दुकानाकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिने आपल्याला धोका दिला त्या आपल्या प्रेयसीला चिडवण्यासाठी त्याने दुकानाचे नाव बदलून 'बेवफा चायवाला' असे ठेवलं आहे. 

सध्या या दुकानाची जोरदार चर्चा आहे आणि लोक या दुकानात चहाचा आस्वादही घेण्यासाठी देखील मोठ्या संख्येने येत आहेत. लवलेश पाटील असं या तरुणाचं नाव असून तो उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील बबेरू भागातील रहिवासी आहे. त्याने बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. दुकानाला बेवफा चायवाला नाव देण्याचं कारण विचारल्यावर तो आपल्या मनाची अवस्था सांगू लागतो. कॉलेजमध्ये शिकत असताना एकत्र शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या प्रेमात पडल्याचं तो सांगतो. या तरुणीने त्याला प्रेमात धोका दिला. 

'बेवफा चायवाला'

निराश होऊन तो सांगतो की प्रेम प्रत्येकाला होतं पण प्रेमात कोणीही कोणाला धोका देऊ नये. तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण पूर्ण करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती, म्हणून त्याने चहाचं दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. दुकानाला वेगळी ओळख देण्यासाठी मी मला धोका देणाऱ्या मैत्रिणीच्या नावावरून दुकानाचे नाव बदलून 'बेवफा चायवाला' असे ठेवले.

प्रेमात धोका मिळालेल्यांसाठी आहे ऑफर

चहाच्या दुकानाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रेमी युगुलांसाठी चहा 15 रुपयांना मिळतो आणि प्रेमात धोका मिळालेल्यांना 10 रुपयांना चहा मिळतो. दुकानाच्या नावाच्या आकर्षणामुळेच चहा प्यायला आल्याचे येथील चहा पिणारे लोक सांगतात. लवलेश चहाही अगदी मनापासून बनवतो. चहा प्यायल्यानंतर चहाचा दर्जा कळतो. या दुकानात संध्याकाळी खूप गर्दी असते. यामध्ये प्रेमीयुगुल, मैत्रिणी किंवा विवाहित जोडपे चहाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: bewafa chai wala tea stall in banda after breakup special offer for lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.