जगातील सगळ्यात मोठं प्रायव्हेट जेट, सुविधा वाचून व्हाल अवाक्; कोण आहे मालक?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 01:44 PM2023-12-07T13:44:19+5:302023-12-07T13:45:12+5:30
या रूम्स विमानाच्या कॉकपिटच्या एकदम जवळ आहेत. तरीही यात इंजिनाचा आवाज येत नाही.
जगातल्या सगळ्यात मोठ्या प्रायव्हेट जेटला 'फ्लाइंग मेंशन' असं नाव देण्यात आलं आहे. हे दिसायला इतकं सुंदर आहे की, क्वचितच कुणी कल्पना केली असेल. इकॉनॉमी क्लासने तुम्ही जर आनंदी नसाल, तर हे लक्झरी बोईंग 747-8 जेट तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. यात अनेक बेडरूम, डायनिंग रूम आणि मास्टर सुट. त्यासोबतच या लोकांच्या प्रायव्हसीची खूप काळजी घेतली जाते. या रूम्स विमानाच्या कॉकपिटच्या एकदम जवळ आहेत. तरीही यात इंजिनाचा आवाज येत नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, रूम्सनाही खास पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे. यात सेंटरमध्ये बेड ठेवला जातो. साहित्य ठेवण्याची बरीच जागा असते. अशात तुम्ही तुम्हाला हवं तेवढं साहित्य नेऊ शकता. इंटेरिअरचा कलरहीही असा असतो जेणेकरून सोन्याचा महालाचा फील येतो. तसेच बाथरूमबाबत सांगायचं तर ते आरश्यांनी कव्हर केलेले आहेत. फर्निशिंग लाकडाची आहे त्यावरही सोनेरी रंग आहे. मास्टर बेडरूमपासून लिव्हिंग रूमपर्यंत जाण्यासाठी गोल्डन पायऱ्या आहेत. इथे सोफेही आहेत.
भलेही विमानात कितीही जागा असेल, पण यात स्टाइलमध्ये काहीच तडजोड करण्यात आलेली नाही. पूर्ण विमानात खास लाकडाचा वापर करण्यात आला आहे. जेटमध्ये ड्रिंक्स आणि गेम्सहीची व्यवस्था करण्यात आली आहे. बोईंग 747-8 ने पहिल्यांदा नोव्हेंबर 2005 मध्ये उड्डाण घेतलं होतं. त्यावेळी या विमानात एकावेळी 467 प्रवासी जाऊ शकत होते. पण यासाठी तुम्हाला मोठी रक्कम द्यावी लागते. हे विमान रिअल इस्टेट टायकून जोसेफ लाऊकडे आहे. त्यांची एकूण संपत्ती 10.3 बिलियन पाऊंडपेक्षा जास्त मानली जाते.