अजबच! महिलेच्या मागेच लागला किंग कोब्रा, 12 दिवसात 3 वेळा मारला दंश; डॉक्टर हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:34 PM2023-08-18T13:34:13+5:302023-08-18T13:35:14+5:30
हैराण करणारी बाब म्हणजे महिेलेला तिन्ही वेळा तिच्या घरातच विषारी सापाने दंश मारला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेला कोब्रासारख्या सापाने दंश मारला.
असं म्हटलं जातं की, जेव्हा नशीब वाईट असतं तेव्हा व्यक्तीसोबत काहीही होऊ शकतं. अशीच एक घटना बिहारच्या राघोपूरमधून समोर आली आहे. इथे एका 26 वर्षीय महिलेला गेल्या 12 दिवसात तीन वेळा एका विषारी सापाने दंश मारला. सुदैवाने तिन्ही वेळा वेळीच उपचार मिळाल्याने महिलेचा जीव वाचला. हैराण करणारी बाब म्हणजे महिेलेला तिन्ही वेळा तिच्या घरातच विषारी सापाने दंश मारला. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, महिलेला कोब्रासारख्या सापाने दंश मारला.
जेव्हा रूग्णाला डॉक्टरांकडे नेलं जातं तेव्हा डॉक्टर दंश मारलेल्या जागेवर असलेल्या खूणेवरून दंश मारणाऱ्या सापाची माहिती मिळवतात की, साप विषारी होता की बिनविषारी. क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट डॉ. एचके झा यांनी सांगितलं की, जेव्हा रूग्ण आमच्याकडे पोहोचतो तेव्हा आम्ही दंश मारलेल्या ठिकाणी बघतो की, ब्लीडिंग झालं का, सूज आहे का किंवा श्वास घेण्यास समस्या होत आहे का.
26 वर्षीय पीडित महिला पुष्पा देवीने सांगितलं की, सकाळी साधारण 3 वाजता ती घरात झोपली होती. तेव्हाच डाव्या हातावर सापाने दंश मारला. सापाने दंश मारल्यावर ती जागी झाली आणि तिला दिसलं की, हातातून रक्त येत आहे. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
कसा केला जातो उपचार
लगेच केल्या जाणाऱ्या उपचाराबाबत समजलं की, महिलेला एका कोब्रासारख्या सापाने दंश मारला. ज्यामुळे सापाचं विष महिलेच्या शरीरात पसरलं होतं. सापाचं विष कंट्रोल करण्यासाठी महिलेला 19 अॅंटीवेनम वायल आणि 2 न्यूस्टिमीन वायल औषध देण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, जर रूग्णांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचा जीव वाचू शकतो.