बिहारमध्ये लग्नात असा वाद पेटला की अंधारात पळून गेले पाहुणे, नवरदेवाला ठेवलं बांधून....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:50 AM2021-05-31T11:50:28+5:302021-05-31T11:52:30+5:30
ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.
लग्न म्हटलं की, अनेक विचित्र घटना समोर येत असतात. कधी लग्नातच हुंड्यावरून गोंधळ होतो तर कधी नवरदेवाच्या शिक्षणावरून. पण बिहारच्या एका लग्नातून एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. ही घटना वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ही घटना आहे चाचोपाली गावातील. इथे खोट्या दागिन्यांवरून लग्नात इतका वाद झाला की, लग्न मोडावं लागलं.
मीडिया रिपोर्टनुसार, चाचोपाली गावात गुरूवारी सतवार गावातून वरात आली होती. यावेळी एका रिवाजादरम्यान नवरदेवाकडील लोकांनी खऱ्या दागिन्यांऐवजी खोटे दागिने दिले गेले. यावरून नवरी-नवरदेव दोन्हीकडील लोकांमध्ये वाद झाला. ज्यानंतर हे लग्न मोडलं आणि वरातीत आलेले लोक कसेतरी तिथून पळून घरी पोहोचले. (हे पण वाचा : प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही माथेफिरू प्रियकर, रस्त्यात अडवून झाडली तिच्यावर गोळी)
रिपोर्टनुसार, अभिषेक कुमार नावाच्या नवरदेवाचं लग्न हुंड्यात एक लाख रूपये नगदी आणि बाइक देऊन ठरलं होतं. तेच नवरदेवाचे वडील लग्नात ९० हजारांचे दागिने देतील असंही ठरलं होतं. पण त्यांनी ९०० रूपयांचे खोटे दागिने दिले. यावरून वाद पेटला तर नवरीकडील लोकांनी हुंड्यात बाईक देण्यास नकार दिला. (हे पण वाचा : बहिणीच्या सासरी गेला होता भाऊ, तिथे असं काही घडलं की चक्क बहीण-भावाचं लग्न लावून देण्यात आलं!)
यानंतर वाद इतका पेटला की, नवरीकडील लोकांनी नवरदेवाकडील काही लोकांनी बंदी बनवलं. यातील काही लोक रात्रीच्या अंधारात पळून गेले. या घटनेची माहिती संपूर्ण गावात आगीसारखी पसरली. त्यानंतर गावातील प्रमुख लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी वाद मिटवला. यानंतर संपूर्ण गावासमोर दोन्ही पक्षाकडील लोकांनी एकमेकांना दिलेलं साहित्य आणि हुंडा परत करण्याचं ठरलं. तेव्हा कुठं हा वाद मिटला.