बाबो! भर रस्त्यात गर्लफ्रेन्डने बॉयफ्रेन्डला दिला चांगला चोपा, जाणून घ्या कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 04:50 PM2021-12-29T16:50:13+5:302021-12-29T16:51:04+5:30
Bihar : भर रस्त्यात दोन महिला एका तरूणाला मारताना दिसल्या तर ते बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. तरूणी आणि तिची आई यावेळी तरूणाच्या लागोपाठ कानशीलात लगावत होत्या.
बिहारच्या (Bihar) हाजीपूरमधून (hajipur) एका गर्लफ्रेन्डने तिच्या बॉयफ्रेन्डला भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. यावेळी तरूणीसोबत तिची आई सुद्धा होती. तिनेही तरूणाला चोप दिला. इतकंच नाही तर सर्वांसमोर त्याला शिव्याही (Boyfriend beaten up by Girlfriend) दिल्या. बॉयफ्रेन्ड यावेळी म्हणाला की, गेल्या तीन वर्षांपासून ती त्याच्यासोबत बोलत होती आणि आता दुसऱ्या तरूणासोबत तिचं अफेअर सुरू आहे. तरूण हेही म्हणाला की, त्याने तरूणीसोबत लग्नही केलं आहे.
भर रस्त्यात दोन महिला एका तरूणाला मारताना दिसल्या तर ते बघण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली. तरूणी आणि तिची आई यावेळी तरूणाच्या लागोपाठ कानशीलात लगावत होत्या. तर तरूण स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. हा सगळा प्रकार बघण्यासाठी मोठी गर्दी जमल्याने पोलिसही आले. इतकंच काय तर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी तरूण म्हणाला की, त्याला बोलवून मारहाण करण्यात आली. तो छपरा येथील राहणारा आहे.
प्रियकर आणि प्रेयसीमध्ये काही कारणाने हाजीपूर डाकबंगलाच्या चौकात वाद झाला होा. यावेळी तरूणीची आई सुद्धा तिच्यासोबत होती. दोघींनी तरूणाला चांगलाच चोप दिला. तेच तरूणाने लोकल मीडियासोबत बोलताना सांगितलं की, तरूणीचं दुसऱ्या मुलासोबत अफेअर सुरू आहे. यामुळे त्याने तिच्यापासून दूर जाणं पसंत केलं.
तरूणीची आई सतत हेच म्हणत होती की, तरूणाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला. त्यांचं भांडण बघण्यासाठी आजूबाजूची लोक जमा झाले होते. ते पोलीस आल्यानंतर पळाले. गर्दी इतकी जमली होती की, रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं.