'माझं लग्न लावून द्या..', होणाऱ्या पतीला मार्केटमध्ये पाहून तरूणीने रस्त्यावरच धरला हट्ट आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:44 PM2022-08-29T15:44:13+5:302022-08-29T15:44:53+5:30

Bihar : हा सगळा ड्रामा पाहून लोकांची गर्दी जमा जमा होती, त्यामुळे तरूणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने त्याच्या मागे धावत जात त्याला पुन्हा पकडलं आणि म्हणाली, 'माझं लग्न लावून द्या'.

Bihar : Girl's high voltage drama seeing her husband in Market | 'माझं लग्न लावून द्या..', होणाऱ्या पतीला मार्केटमध्ये पाहून तरूणीने रस्त्यावरच धरला हट्ट आणि मग...

'माझं लग्न लावून द्या..', होणाऱ्या पतीला मार्केटमध्ये पाहून तरूणीने रस्त्यावरच धरला हट्ट आणि मग...

googlenewsNext

बिहारच्या (Bihar) नवादामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे एक तरूणी तिच्या आई-वडिलांसोबत मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. दरम्यान तिला अचानक मार्केटमध्ये तिचा होणारा पती दिसला. त्यानंतर भर तिने त्याला पकडलं आणि लग्न लावून देण्याचा हट्ट करू लागली. हा सगळा ड्रामा पाहून लोकांची गर्दी जमा जमा होती, त्यामुळे तरूणाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने त्याच्या मागे धावत जात त्याला पुन्हा पकडलं आणि म्हणाली, 'माझं लग्न लावून द्या'.

'आजतक' ने दिलेल्या वृत्तानुसार, तरूणीच्या कुटुंबियांनी सांगितलं की, तीन महिन्यांआधी याच तरूणासोबत त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. हुंड्यात एक बाइक आणि 50 हजार रूपये रोख देण्यात आले होते. लग्नाची वेळ जवळ आली तेव्हा तरूणाने लग्न पुढे ढकलण्यास सांगितलं. त्यानंतर मुलाकडील लोक लग्न टाळत राहिले. लग्न टाळण्यासाठी तरूण काही दिवसांपासून लपून होता.

त्यानंतर आता जेव्हा तो मार्केटमध्ये दिसला तेव्हा तरूणीने त्याला पकडून लग्नासाठी हट्ट सुरू केला. त्याने तिचा सोडवून पळून जाण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण तरूणी आणि तिच्या आई-वडिलांनी त्याला पुन्हा पकडलं. तरूण महकार गावातील आणि तरूणी महुली गावातील आहे.

बराचवेळ रोडवर सुर असलेल्या या ड्रामाची सूचना पोलिसांना मिळाली तर त्यांनी यात हस्तक्षेप केला. दोन्ही परिवारांना पोलीस सोबत घेऊन गेले. दोन्ही परिवारांना समजावून सांगितलं. त्यानंतर दोन्ही परिवारांच्या सहमतीने दोघांचं लग्न पोलीस स्टेशनच्या आवारातील मंदिरात लावून देण्यात आलं.

Web Title: Bihar : Girl's high voltage drama seeing her husband in Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.