बाबो! माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकली, पतीने गर्लफ्रेन्डसोबत लगेच उरकून टाकलं दुसरं लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 01:35 PM2020-04-16T13:35:05+5:302020-04-16T13:35:30+5:30

लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ती माहेरीच अडकून राहिली. इकडे पतीने थेट दुसरं लग्नच उरकून टाकलं.

Bihar husband married with girlfriend after wife stucks in lockdown api | बाबो! माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकली, पतीने गर्लफ्रेन्डसोबत लगेच उरकून टाकलं दुसरं लग्न!

बाबो! माहेरी गेलेली पत्नी लॉकडाऊनमुळे तिकडेच अडकली, पतीने गर्लफ्रेन्डसोबत लगेच उरकून टाकलं दुसरं लग्न!

googlenewsNext

जगभरातून लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या विचित्र घटना समोर येत आहेत. भारतातही अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊनमुळे नाती तुटण्याच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनाही समोर येत आहेत. अशात एक डोकं चक्रावून सोडणारी घटना समोर आली आहे. एक महिला माहेरी गेली होती, दरम्यान लॉकडाऊनची घोषणा झाली आणि ती माहेरीच अडकून राहिली. इकडे पतीने थेट दुसरं लग्नच उरकून टाकलं.

बिहारच्या दुल्हन बाजार परिसरातील ही घटना आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भरतपुरा येथे राहणारा धीरज कुमारच लग्न काही वर्षांआधी करपी पोलीस हद्दतील पुराणमधील मुलीसोबत झालं होतं. धीरजची पत्नी काही कामानिमित्त काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. दरम्यान कोरोनापासून बचावासाठी सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे ती पतीच्या घरी परत येऊ शकली नाही. अशात त्याने पत्नीला अनेक घरी परत येण्यास सांगितले.

लॉकडाऊनमध्ये वाहने बंद असल्याने पतीने बोलवल्यानंतरही महिला परत सासरी जाऊ शकली नाही. याचाच राग मनात ठेवून धीरज कुमारने थेट दुसरं लग्न उरकून टाकलं. त्याने रघुनाथपूर येथील त्याच्या प्रेयसीसोबत दुसरं लग्न केलं. याची माहिती धीरजच्या पहिल्या पत्नीला लागली तर तिने पोलिसात तक्रार दिली.

पतीच्या दुसऱ्या लग्नाची माहिती मिळताच पहिल्या पत्नीने पती आणि त्याच्या घरातील लोकांवर हुंड्यासाठी अत्याचार केल्याची तक्रार पोलिसात दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धीरज कुमारला चौकशीसाठी बोलवलं. त्यानंतर गुरूवारी त्याल पोलिसांनी ताब्यात घेतलं.

Web Title: Bihar husband married with girlfriend after wife stucks in lockdown api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.