बोट बुडाल्यावर गंगेत वाहून गेला होता तरूण, १९ तासांपर्यंत जीवनाशी दिला लढा आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 03:37 PM2021-08-12T15:37:58+5:302021-08-12T15:38:53+5:30
दिनेश्वरने हिंमत ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि आपला जीव वाचवला. त्याने विचार केला की, जंगलात मरण्यापेक्षा गंगेकडे जाऊ.
बिहारच्या सेमरा गावातील एक तरूण दिनेश्वर रायने १९ तास आयुष्याशी लढा देत विजय मिळवला आहे. सोमवारी रात्री ९ ते १२ वाजतापर्यंत तीन तासांपर्यंत गंगा नदीत वाहून गेल्यावर २०-२२ किलोमीटर दूर तो जंगलात किनारी लागली. त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत तो जंगलात फिरत राहिला. एकीकडे जंगल आणि दुसरीकडे गंगा नदी बघून त्याला काही समजत नव्हतं. पण दिनेश्वरने हार मानली नाही.
दिनेश्वरने हिंमत ठेवून परिस्थितीनुसार निर्णय घेतले आणि आपला जीव वाचवला. त्याने विचार केला की, जंगलात मरण्यापेक्षा गंगेकडे जाऊ. बराचवेळ फिरल्यानंतर त्याला एक झाड दिसलं. त्याच्या फांद्या तोडून त्याने पाण्यावर तरंगण्यासाठी एक वस्तू तयार केली आणि गंगेत उतरला.
४ तास पोहत राहिला...
मीडिया रिपोर्टनुसार, साधारम ४ तास मदतीच्या आशेने दिनेश्वर पोहत राहिला. त्यानंतर मंगळवारी चार वाजता पटणा जिल्ह्यातील गोरेया स्थानासमोरच्या नीलकंठ टोला दियारेच्या लोकांनी त्याला नदीतून काढलं. आरा-छपरा पुलाखाल गंगेत सोमवारी एक बोट नाव बुडाली होती. या दुर्घटनेत १२ मजूरांपैकी सहा लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. इतर ६ लोक नदीत वाहून गेले. ज्यातील एक दिनेश्वर होता.
कसा वाचला जीव?
मनेरपासून पाच किलोमीटर पुढे दरवेशपुर गावासमरो दियारेकडे डेंगीकडून येत असलेल्या राकेश दुबे, अल्टा राय आणि रंजीत रायने दुरूनच एका तरूणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. फांद्याच्या आधाराने हा तरूण पोहत होता. त्यानंतर कसंतरी लोकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं. तरूण ठीकपणे बोलूही शकत नव्हता. त्याला भूक लागली होती. लोकांनी त्याला खायला दिलं. त्यानंतर त्याच्या शरीराची मालिश करण्यात आली. त्यानंतर तो बरा झाला.
दिनेश्वरने सांगितलं की, अर्ध्या रात्री पाण्यातून बाहेर आल्यावर काहीच सुचत नव्हतं. जंगल-झाडांच्या बेटाववर रात्रभर फिरत राहिलो. यानंतर सकाळी झाडावर चढून मदत मागण्याचा प्रयत्न केला. पण दूरदूरपर्यंत कुणी नव्हतं. त्यानंतर देवाचं नाव घेऊन मी गंगेत उतरलो तर देवाने माझं ऐकलं.