...म्हणे मोदींनी मला पैसे पाठवलेत! खात्यात चुकून आलेले ५.५ लाख देण्यास ग्राहकाचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 04:26 PM2021-09-15T16:26:54+5:302021-09-15T16:27:11+5:30
मोदी सरकारनं माझ्या खात्यात पैसे जमा केलेत, मी ते परत करणार नाही; ग्राहकाचा ठाम पवित्रा
पाटणा: बिहारच्या खगडियामध्ये एक अजब घटना घडली आहे. एका बँक ग्राहकाच्या खात्यात चुकून ५.५० लाख रुपये जमा झाले. मोदी सरकारनं मदत म्हणून पैसे खात्यात जमा केल्याचा ग्राहकाचा समज झाला. त्यानं ते पैसे खर्चदेखील केले. बँक अधिकाऱ्यांना त्यांची चूक लक्षात येताच त्यांनी ग्राहकाला पैसे परत करण्यास सांगितलं. मात्र ग्राहकानं नकार दिला. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ग्राहकाला अटक केली.
खगडियामधील बख्तियारपूर ग्रामीण बँकेत रणजीत दास नावाच्या व्यक्तीचं खातं आहे. बँक कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे त्याच्या खात्यात ५.५० लाख रुपये जमा झाले. खात्यात पैसे आलेले पाहून दासला आनंद झाला. सरकारनं थेट बँक खात्यात मदत केल्याचा त्याचा समज झाला. त्यानं खात्यात आलेले बरेचसे पैसे खर्चदेखील केले.
इतिहासाचं वर्तुळ पूर्ण होणार? रतन टाटा खास मिशनवर; स्पेशल १२ अधिकारी लागले कामाला
बँक अधिकाऱ्यांना त्यांच्या हातून घडलेली चूक लक्षात आली. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी रणजीत दासला पैसे परत करण्यास सांगितलं. त्यावर मला मोदी सरकारनं पैसे पाठवलेत. मी ते परत करणार नाही, असं उत्तर दासनं दिलं. त्यानंतर बँकेनं दासच्या नावानं नोटीस काढली. मात्र त्यानंतरही त्यानं पैसे परत केले नाहीत.
रणजीत दास पैसे करत नसल्यानं बँक अधिकाऱ्यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दासला अटक केली. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करत आहेत. दासच्या खात्यात ५.५० लाख रुपये जमा झाले होते. त्यानं ते पैसे खर्च केल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.