काय सांगता! नव्या नवरीला पतीच्या घरात 'नो एन्ट्री'; नवदाम्पत्याचं घरासमोरच ठिय्या आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 11:04 AM2021-04-29T11:04:58+5:302021-04-29T11:10:54+5:30
घरातील लोक आडकाठी आणू शकत असल्याची त्यांना शंका होती. त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून दोघांनीही कुणालाही न सांगता मंदिरात सात जन्म एकत्र राहणाऱ्या आणाभाका घेतल्या.
जहानाबादमध्ये एका तरूणाला आपल्या मर्जीने लग्न करणं चांगलंच महागात पडलं आहे. तरूणाने घरच्यांच्या विरोधात जाऊन लव्ह मॅरेज केलं तर घरातील लोकंच त्याचे वैरी झाले. भेलावर ओरी परिसरातील लक्ष्मीबिगहा गावात राहणारा राकेश कुमार शिक्षण घेत असताना मुडेल गांवातील विभा कुमारीच्या प्रेमात पडला. हायस्कूलमधील त्यांची मैत्री प्रेमात बदलली. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी दोन वर्षांच्या प्रेमानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
दोघांचा लग्नाचा निर्णय पक्का होता. मात्र, घरातील लोक आडकाठी आणू शकत असल्याची त्यांना शंका होती. त्यामुळे असं काही होऊ नये म्हणून दोघांनीही कुणालाही न सांगता मंदिरात सात जन्म एकत्र राहणाऱ्या आणाभाका घेतल्या. लग्नानंतर जसा राकेश विभाला घेऊन घरी पोहोचला तसा घरातील लोकांना गोंधळ सुरू केला. नवा नवरीला त्यांनी घराच्या उंबरठ्यावर पायही ठेवू दिला नाही.
हा सगळा गोंधळ पाहून दोघेही हैराण झाले. पण त्यांनीही हार न मानण्याचा निश्चय केला होता. दोघेही घराबाहेरच धरण्यावर बसले. तेच गावातील लोकही प्रेम, लग्न आणि नंतर विरोधाचा तमाशा बघण्यासाठी तिथे जमले होते. तेही नव्या जोडप्याला घरात येऊ देण्याची विनंती करत होते. मात्र, राकेशचे हट्टी कौटुंबिक काही ऐकायला तयार नव्हते.
हे प्रकरण काही वेळातच दुसऱ्या गावात पोहोचलं. आजूबाजूच्या गावात यावरून चर्चा होत आहे. दरम्यान गावातील लोक दब्या आवाजात लग्नानंतर विरोध करण्यावरून आता प्रश्नही उपस्थित करू लागले आहेत. दरम्यान प्रेमाची लढाई जिंकलेला राकेश आणि विभा आपल्या लोकांचं मन वळवण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहेत.