बाबो! नाराज होऊन पत्नी माहेरी गेल्यावर पठ्ठ्याने असा कारनामा केला की तुरूंगात रात्र काढावी लागली!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 04:42 PM2021-06-08T16:42:27+5:302021-06-08T16:43:19+5:30
पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.
पती आणि पत्नीतील प्रेमाचे अनेक किस्से तुम्ही ऐकलं किंवा पाहिले असतील. अशीच एक पतीचं पत्नीवरील प्रेम दाखवणारी घटना बिहारच्य पूर्णियामधून समोर आली आहे. इथे पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यातील संदीप कुमारचं लग्न दोन वर्षाआधी झालं होतं. पत्नी माहेरी गेल्यावर तो असा काही नाराज झाला की, स्कूटीने तो ४९५ किलोमीटरचं अंतर पार करत पूर्णियाला पोहोचला. (हे पण वाचा : २८ बायका, १३५ मुले आणि १२६ नातवंडांसमोर 'या' व्यक्तीने केलं असं काही, लोक झाले हैराण)
पोलिसांनी पुढे सांगितले की, शनिवारी रात्री त्याला प्रवास करताना काही वाईट लोकांनी त्रास दिला. त्यामुळे त्याने रात्र घालवण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी सांगितलं की, संदीप कुमारचं त्याच्या पत्नीवर खूप प्रेम आहे. पण अचानक त्याची पत्नी माहेरी केली. अनेक प्रयत्न करूनही ती परतली नाही तेव्हा तो स्वत; तिला भेटण्यासाठी निघाला होता. (हे पण वाचा : लेडी बाहुबली! गॅस सिलेंडरसोबत वर्कआउट करते ही महिला, तेही नाडी नेसून; व्हिडीओ व्हायरल)
त्यांनी सांगितलं की, पोलिसांनी जेव्हा त्याला ओळखपत्र दाखवण्यास सांगितलं तर तो दाखवू शकला नाही. अशात त्याची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी कुशीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. संदीपच्या वडिलांनी पूर्णिया पोलिसांना त्याला पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्याची विनंती केली.
संदीपचे वडिल बृज बिहारी सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, संदीपची पत्नी माहेरी गेल्यापासून तो जरा निराश आहे. त्यानंतर पूर्णिया पोलिसांनी संदीपचं त्याच्या पत्नीसोबत बोलणं करून दिलं. पत्नीही परत येण्यास तयार झाली. पोलीस म्हणाले की, संदीपचा पूर्णियाशी काहीच संबंध नाही तो बस भकटत तिथे पोहोचला होता.