बिकीनी घालून शेती करते ही महिला, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:39 AM2023-02-02T11:39:31+5:302023-02-02T11:40:22+5:30

Bikini Farmer : ही महिला शेतकरी यूरोपमधील आहे. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा या महिलेचे फोटो व्हायरल झाले तेव्हा लोकांना तिच्याबाबत समजलं. ही महिला शेती करते आणि तिला शेती करायला आवडतं.

Bikini farmer trolled for her outfits while work in field responded on social media | बिकीनी घालून शेती करते ही महिला, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर दिलं सडेतोड उत्तर

बिकीनी घालून शेती करते ही महिला, सोशल मीडियावर ट्रोल झाल्यावर दिलं सडेतोड उत्तर

googlenewsNext

Bikini Farmer Trolled For Outfits: तुम्ही अनेक शेतकऱ्यांना शेती करताना पाहिलं असेल, ते सगळे मेहनत करून जमिनीची मशागत करून आपल्या परिवाराचं पोट भरतात. यासोबतच धान्य पिकवून देशाची सेवाही करतात. पण सध्या एका अशा महिलेचे फोटो व्हायरल झाले आहेत जी स्वत:ला बिकीनी शेतकरी मानते. तिची खासियत म्हणजे ती बिकीनी घालून शेती करते.

ही महिला शेतकरी यूरोपमधील आहे. डेली स्टारच्या एका रिपोर्टनुसार, जेव्हा या महिलेचे फोटो व्हायरल झाले तेव्हा लोकांना तिच्याबाबत समजलं. ही महिला शेती करते आणि तिला शेती करायला आवडतं. महिलेकडे काही घोडेही आहेत आणि तिला घोडेस्वारीची आवडही आहे. खास बाब म्हणजे ही महिला केवळ बिकीनी घालून शेतातील कामे करते.

सोशल मीडियावर  यामुळेच या महिलेला बिकीनी farmer असं  म्हटलं जात आहे. ती तिच्या @the_fancy_farmer नावाच्या अकाऊंटवर तिचे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करत असते. महिलेने सांगितलं की, तिला शेतातील कामे करायला खूप आवडतं. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिला बिकीनीवरून ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावर महिलेने सडेतोड उत्तर दिलं. 

महिलेने ट्रोलर्सना विचारलं की, एक महिला बिकीनी घालून शेती करू शकत नाही का? महिला म्हणाली की, कुणाला काय वाटतं ते बोलावं त्याने मला फरक पडत नाही. सध्या ही महिला तिचे शेतातील अनेक फोटो पोस्ट करत असते आणि त्या फोटोंमध्ये ती बिकीनीमध्ये दिसत आहे.

Web Title: Bikini farmer trolled for her outfits while work in field responded on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.