भारीच! अब्जाधीश उद्योजकाने केला लाखोंचा खर्च; कर्मचाऱ्यांसह कुटुंबाला दिली 'ही' खास भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 11:01 AM2023-11-01T11:01:48+5:302023-11-01T11:06:18+5:30
अब्जाधीश उद्योगपतीने आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे.
अमेरिकन अब्जाधीश उद्योगपतीने आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. त्याने आपल्या 1200 कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत डिस्नेलँड टोकियोच्या ट्रिपवर पाठवलं आहे. मल्टिनॅशनल कंपनी सिटाडेल एलएलसीचे CEO आणि सिटाडेल सिक्योरिटीजचे संस्थापक केनेथ सी. ग्रिफिन यांना सिटाडेलच्या च्या 30 व्या आणि सिटाडे सिक्योरिटीजच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त तीन दिवसांच्या ट्रिपवर पाठवण्यात आलं आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, सिटाडेलचे प्रवक्ते यिन ए के यांच्या म्हणण्यानुसार, ग्रिफिनने आपल्या कर्मचाऱ्यांना पासही दिले ज्यामुळे कर्मचार्यांना बिग थंडर माउंटन, पायरेट्स ऑफ द कॅरिबियन आणि डिस्नी वर्ल्ड येथे स्पेस माउंटनसह प्रमुख राइड्स आणि इतर ठिकाणी जाता येणार आहे. डिस्नेलँडसाठी एका दिवसाच्या पासची किंमत $52.75 (रु. 4,392) ते $72.78 (रु. 6,059) आहे. ग्रिफिन एका दिवसाच्या पार्क सेलिब्रेशनसाठी $87,336 (रु. 72,71,966) खर्च करू शकतो.
ग्रिफिनने केल्विन हॅरिस (स्कॉटिश डीजे) आणि मरून 5 (पॉप बँड) यांना परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. टोकियोमध्ये या काळात, वर्धापन दिनाचे कार्यक्रम, प्रवास, हॉटेल, भोजन, पार्कची तिकिटे, मनोरंजन आणि मुलांची काळजी यासाठी जो काही खर्च येईल, तो सर्व तो उचलेल. द मेसेंजरच्या मते, कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही असाच उत्सव साजरा केला होता. त्यानंतर ग्रिफिनने अमेरिका आणि युरोपमधील आपल्या सहकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसह फ्लोरिडामधील ओरलँडो येथील डिस्ने वर्ल्डमध्ये नेलं होतं.
आठवड्याच्या शेवटी झालेल्या कार्यक्रमाला जवळपास 10,000 लोक उपस्थित होते. ज्यामध्ये डीजे डिप्लो, कोल्डप्ले आणि कार्ली रे जेप्सन यांच्या परफॉर्मन्सचाही समावेश होता. आपल्या कर्मचाऱ्यांना अशा सुविधा दिल्याबद्दल ग्रिफिनचे कौतुक करण्यात आले आहे. कंपनीचा फायदा करताना तो कर्मचाऱ्यांना कधीच विसरत नाही. यासाठी तो अशा भेटवस्तू देत असतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.