अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली अब्जाधीशाची पत्नी, त्याच्याकडून वसूल केली मोठी रक्कम; कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:05 PM2022-02-10T13:05:20+5:302022-02-10T13:07:35+5:30
Marisol Yotta : मॉडल मॅरिसोल योट्टाचं लग्न २०२१ मध्ये जर्मनीतील अब्जोपती उद्योगपती बास्टियन योट्टासोबत झालं होतं. मॅरिसोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत.
जर्मनीतील एका अब्जोपती उद्योगपतीची पत्नी एका अनोळखी व्यक्तीसोबत डेटवर गेली. इतकंच नाही तर त्या व्यक्तीकडून साधारण अडीच लाख रूपये चार्जही घेतला. या महिलेने स्वत: याबाबत माहिती दिली. मॉडल मॅरिसोल योट्टाचं (Marisol Yotta) लग्न २०२१ मध्ये जर्मनीतील अब्जोपती उद्योगपती बास्टियन योट्टासोबत झालं होतं. मॅरिसोल सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव असते. तिचे इन्स्टाग्रामवर ५ लाख फॉलोअर्स आहेत.
नवरा-बायकोत लागलीये रेस
मॉडल मॅरिसोल योट्टा आपल्या एका फॅनसोबत डेटवर गेली होती. तिने सांगितलं की, सोशल मीडियाबाबत पती आणि तिच्या एक कॉम्पिटिशन सुरू आहे. दोघांमध्ये सर्वात जास्त फॅन बनवण्याची स्पर्धा लागली आहे. दोघांना हे बघायचं आहे की, एक महिन्यात कोण सोशल मीडियावरून किती जास्त कमाई करतो. या स्पर्धेनुसार, मॉडलने एका फॅनकडून अडीच लाख रूपये घेतले आणि ती त्याच्यासोबत डेटवर गेली.
बास्टियन योट्टा फारच लक्झरी लाइफ जगण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याची कंपनी अनेक प्रकारच्या मशीन तयार करते. ज्यात वजन कमी करण्याच्या मशीनचाही समावेश आहे. योट्टा लाइफ नावाने त्याचं एक इन्स्टाग्राम अकाऊंटही आहे. ज्यावर तो त्यांचे शानदार फोटो पोस्ट करत असतो. जर्मनीमध्ये राहत असताना बास्टियनला आपल्या ग्लॅमरस लाइफमुळे अडचण होत होती, ज्यामुळे तो नंतर अमेरिकेत शिफ्ट झाला.
योट्टा म्हणाला होता की, जर्मनीचे लोक त्याच्यावर जळतात आणि त्याच्या लाइफस्टाईलवर प्रश्न उपस्थित करतात. त्यामुळे त्याला अमेरिकेत शिफ्ट व्हावं लागलं. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, लोक हॉलिडेवर जातात. पण त्यांच्याकडे holilife. कारण त्यांच्यासाठी रोजच हॉलिडे आहे. तो असंही म्हणाला होता की, तो याची अजिबात चिंता करत नाही की, एका रात्रीत ८ लाख रूपये खर्च होतात की, १५ लाख रूपये.