आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही...

By अमित इंगोले | Published: October 14, 2020 11:48 AM2020-10-14T11:48:05+5:302020-10-14T12:05:19+5:30

या अनोख्या पक्ष्याचं नाव ग्रुजबिक्स असं सांगितलं जात आहे. या पक्ष्याच्या शरीराची बनावट मादी आणि नर दोन्हीसारखी आहे.

Biologists Find Spectacular Rare Bird in Pennsylvania That is Both Male and Female | आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही...

आश्चर्य! वैज्ञानिकांना सापडला आतापर्यंतचा सर्वात दुर्मीळ पक्षी, जो नरही आहे अन् मादाही...

Next

जगाच्या पाठीवर अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात ज्यावर विश्वास करणं कठिण होऊन बसतं. आता पेन्सिल्वेनियात एक असा पक्षी सापडला आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादी आहे. म्हणजे हा पक्षी दुसऱ्या नरासोबत प्रजनन करून अंडी देऊ शकतो किंवा दुसऱ्या मादीसोबत प्रजनन करून तिला गर्भवती करू शकतो. गेल्या ६४ वर्षात पहिल्यांदाच असं झालं आहे. सध्या या दुर्मीळ पक्ष्याची चर्चा रंगली आहे.

sciencealert.com ने दिलेल्या वृत्तानुसार, या अनोख्या पक्ष्याचं नाव ग्रुजबिक्स असं सांगितलं जात आहे. या पक्ष्याच्या शरीराची बनावट मादी आणि नर दोन्हीसारखी आहे. पक्ष्याच्या या प्रजातीत बाहेरील पंख काळे आणि मोठे असतात. या प्रजातीतील पक्ष्यांचे पंख रंगीत असतात. या सापडलेल्या पक्ष्याच्या छातीवर कोणताही निशाण नाही. हीच मादा होण्याची निशाणी आहे. वैज्ञानिक भाषेत या पक्ष्याला गाएंड्रोमॉरफिज्म म्हटलं जातं. (बाबो! समुद्रकिनारी सापडला तब्बल १०० किलोंचा दुर्मिळ कासव, अन् मग...., पाहा फोटो)

कसे तयार होते असे पक्षी?

वैज्ञानिकांनुसार, अशा पक्षी तेव्हा जन्माला येतो जेव्हा एका मादीच्या अंड्यात नराचे असे स्पर्म मिळतात ज्यात दोन न्यूक्लिअस असतात. अशात पिल्लात नर आणि मादी दोन्हीचे क्रोमोजोम येतात. अशी घटना फारच कमी वेळा घडते. हा पक्षी मिळण्याआधी ६४ वर्षाआधी असाच पक्षी सापडला होता. यावर्षी पावडरमिल एविएशन रिसर्च सेंटरमध्ये टीम पक्ष्यांची जनगणना करत होते तेव्हा हा पक्षी सापडला. (VIDEO : बाप रे बाप! या ८ वर्षांच्या मुलीचा 'बेस्ट फ्रेन्ड' आहे ११ फूट लांबीचा अजगर...)

अंडीही देऊ शकतो आणि गर्भवतीही करू शकतो

पक्ष्यांची ही प्रजाती फारच खास आहे. यांच्यात अंडाशय आहे. त्यामुळे हा पक्षी अंडीही देऊ शकतो. सोबतच यात नराचेही गुण आहेत. त्यामुळे ते दुसऱ्या मादी पक्ष्याला गर्भवतीही करू शकतात. पण वैज्ञानिकांचं मत आहे की, पुढे हा पक्षी मादीच्या भूमिकेत राहणार की, नराच्या हे त्याचा आवाजावर अवलंबून आहे. जर हा पक्षी गुणगुणला तरच मादी त्याच्याकडे आकर्षित होईल. नाही तर हा पक्षी दुसऱ्या नराकडे स्वत:च आकर्षित होईल.
 

Web Title: Biologists Find Spectacular Rare Bird in Pennsylvania That is Both Male and Female

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.