आदर्श दाम्पत्याचे प्रतीक मानला जातो हा पक्षी
By Admin | Published: March 26, 2017 12:29 AM2017-03-26T00:29:50+5:302017-03-26T00:29:50+5:30
सारस पक्षी जोडीदार बदलत नाही. त्यामुळे त्यांना आदर्श जोडप्याचे प्रतीक मानले जाते. हा पक्षी
डुंगरपूर : सारस पक्षी जोडीदार बदलत नाही. त्यामुळे त्यांना आदर्श जोडप्याचे प्रतीक मानले जाते. हा पक्षी एकाच जोडीदारासोबत आयुष्य व्यतीत करतो. या दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा त्याच्या शवाजवळ उभा राहून विलाप करीत राहतो आणि कधी-कधी जीवही देतो. या दु:खातून जे वाचतात तेदेखील आयुष्यभर एकटेच राहतात; पण नव्याने जोडी जमवत नाहीत. सारस हा उडणाऱ्या पक्ष्यांतील सर्वात मोठा पक्षी मानला जातो. वागड भागात या पक्ष्यांना हरोडा किंवा हरोडी म्हणून ओळखले जाते. सारसला मान्सूनच्या आगमनाचेही प्रतीक मानले जाते. पावसाळा सुरू होताना हे जोडपे प्रणय नृत्य करते. त्यांचे नृत्य विलोभनीय असते. भाताचे शेत हे त्याचे राहण्याचे आवडते ठिकाण आहे. ते मृदू जमीन आणि तलावाच्या जवळ राहतात. नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्यामुळे तसेच वाढत्या प्रदूषणामुळे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे.