बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:08 PM2019-08-07T16:08:12+5:302019-08-07T16:18:06+5:30

पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलताना अनेकदा ऐकल असेलच. पण कधी तुम्ही पक्ष्यांच्या अंड्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलंय का?

Bird Eggs communicate to each other says research | बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

बाबो! अंडी एकमेकांशी बोलतात म्हणे, रिसर्चमधून आश्चर्यजनक खुलासा...

Next

(Image Credit : Social Media)

पक्ष्यांना, प्राण्यांना तुम्ही त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलताना अनेकदा ऐकलं असेलच. पण कधी तुम्ही पक्ष्यांच्या अंड्यांना एकमेकांशी बोलताना कधी ऐकलंय का? आता तुम्ही म्हणला असं कसं होऊ शकतं? पण हे खरंय. आणि याचा खुलासा स्पेनच्या विगो विश्वविद्यालयाने एका रिसर्चमधून केला आहे. 

(Image Credit : Social Media)

scientificamerican.com या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, अभ्यासकांनी पिवळ्या पायांचे पक्षी 'यलो लेग्ड गल'च्या ९० अंड्यांचा अभ्यास केला. ज्यातून समोर आले की, आई ज्याप्रमाणे धोक्याचा संकेत पाठवते, तसेच अंडे व्हायब्रेट होऊन एकमेकांना सतर्क करतात.

(Image Credit : Social Media)

अभ्यासकांनुसार, जेव्हा धोक्याचा संकेत मिळतो तेव्हा एक अंड बाजूच्या अंड्याला व्हायब्रेट होऊन सावध करतो. म्हणजे त्याला जर धोक्याची कल्पना नसेल तर सावध होईल.

(Image Credit : Social Media)

अभ्यासकांनी सांगितले की, अंड्यातील पिलं फार जास्त धोका किंवा शिकार होण्यासारख्या स्थितीमध्ये मोठ्या आवाजात ओरडतात. अंड्यातील त्यांच्या ओरडण्याचा हा आवाज व्हायब्रेशनच्या रूपाने बाहेर पडतो. हे व्हायब्रेशन दुसऱ्या अंड्यांसाठी भाषेचं काम करतं.

(Image Credit : scientificamerican.com)

या रिसर्चमध्ये अभ्यासकांनी अंड्यांमध्ये होणाऱ्या कंपनाचं बारिक निरिक्षण केलं. तेव्हा ही बाब समोर आली. त्यांनी सांगितले की,  या रिसर्चमधून हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, पक्ष्यांची अंडी एकमेकांशी बोलतात.

Web Title: Bird Eggs communicate to each other says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.