पंख असूनही उडू न शकणारे पक्षी
By Admin | Published: May 11, 2017 12:35 AM2017-05-11T00:35:42+5:302017-05-11T00:35:42+5:30
पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी आहेत. आज अशा पक्ष्यांची माहिती देणार आहोत जे उडता येत नसूनही खूप प्रसिद्ध आहेत.
पंख असूनही उडता न येणारे अनेक पक्षी आहेत. आज अशा पक्ष्यांची माहिती देणार आहोत जे उडता येत नसूनही खूप प्रसिद्ध आहेत.
शहामृग : जगातील सर्वाच मोठ्या पक्ष्यांपैकी एक असलेला शहामृग जमिनीवर ७० कि. मी. प्रतितास एवढ्या वेगाने पळतो. आफ्रिका आणि त्याच्या आसपासच्या भागात आढळणारा हा शानदार पक्षी पंख असूनही उडू शकत नाही.
ताकाह : ताकाह पक्षी दक्षिण बेटावर आढळून येतो. १९४८ मध्ये त्याचा शोध लागला होता. ताकाहलाही पंख असतात; मात्र तो त्यांचा उडण्यासाठी उपयोग करू शकत नाही.
वेका : वेका पक्षी दिसायला खूपच आकर्षक असतो. त्याला पंखही असतात; मात्र त्यालाही उडणे माहिती नाही. हा पक्षी न्यूझीलंडमध्ये अनेक ठिकाणी आढळतो.
काकापो : काकापो या पक्ष्याला घुबड पोपटही म्हणतात. हा पक्षी न्यूझीलंडमध्ये आढळून येतो. कोल्डफिश, माऊंट आइसलॅण्ड आणि लिटिल बेरिअर आइसलॅण्ड बेटांवर त्यांचे वास्तव्य आहे. यालाही उडता येत नाही.
पेंग्विन : अंटार्टिका बेटावर आढळणारा पेंग्विन पक्षीही उडू शकत नाही. पेंग्विन पाण्यात सात मिनिटे माशांचा शोध घेऊ शकतो. एक प्रौढ पेंग्विन एका दिवसात ४५० वेळा शिकारीसाठी पाण्यात उतरू शकतो. अर्थात यालाही उडणे माहीत नाही.
फाल्कलॅण्ड स्टीमर डक
बदक प्रजातीतील हा पक्षी दक्षिण अटलांटिक आइसलॅण्डवर आढळून येतो. त्याला पंख असतात; मात्र तरीही तो उडू शकत नाही.
नार्दर्न कॅसोरी : रंगीत, चमकदार मानेमुळे हा पक्षी कोणालाही ओळखता येतो. कॅसोरीही उडू शकत नाही.
लिटिल स्पॉट किवी : लिटिल स्पॉट किवी हा पक्षी न्यूझीलंडचा आहे. आपल्या प्रजातीतील ही सर्वात छोटी चिमणी असून तिलाही उडता येत नाही.
इमू : इमू आॅस्ट्रेलियाचा पक्षी आहे. १.९ मीटर एवढी उंची असणारा इमू शहामृगानंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्षी आहे. अर्थात हा देखील उडू शकत नाही.