एक्स बॉयफ्रेन्डने सोशल मीडियावर केलं ब्लॉक, महिलेने सूड घेण्यासाठी प्रायव्हेट व्हिडीओ त्याच्या मुलीला पाठवले!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 01:36 PM2021-04-27T13:36:29+5:302021-04-27T13:41:13+5:30
हिलरीने हे कृत्य केलं कारण तिला तिच्या एक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलं होतं. या महिेलेने आपल्या एक्सच्या वडिलांना प्रायव्हेट फोटो पाठवले.
ब्रिटनमध्ये एका महिलेने आपल्या एक्सवर सूड उगवण्यासाठी यूट्यूब त्यांचा सेक्स व्हिडीओच अपलोड केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. ही महिला सूडाच्या भावनेने इतकी ग्रासली होती की, तिने तिच्या एक्सच्या परिवाराला त्यांचे प्रायव्हेट फोटोही पाठवले. ५० वर्षीय हिलरीला या कृत्यासाठी अटक करण्यात आली आहे.
हिलरीने हे कृत्य केलं कारण तिला तिच्या एक्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केलं होतं. या महिेलेने आपल्या एक्सच्या वडिलांना प्रायव्हेट फोटो पाठवले. तेच इन्स्टाग्रामवर एक्सच्या मुलीलाही तिने त्यांचे प्रायव्हेट व्हिडीओज पाठवले. तिने या फोटोंच्या माध्यमातून एक्सची खिल्ली सुद्धा उडवली होती.
यूट्यूबवरही या महिलेने तिच्या एक्सचा सेक्शुअल व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र, व्हिडीओला सेक्शुअल कंटेटमुळे लगेच डिलीट करण्यात आलं होतं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, हिलरी तिच्या एक्सच्या मुलीला म्हणाली की, आता जगभरातील लोक तुझ्या वडिलांचे कृत्य पाहू शकेल. (हे पण वाचा : दुबईत अमेरिकन प्लेबॉयला अटक, यूक्रेनियन मॉडल्ससोबत करत होता न्यूड फोटोशूट)
हिलरीने एक्सच्या मुलीला केलेल्या मेसेजमध्ये असंही लिहिलं की, माझ्या ऑफिसमध्ये काम करणारे अनेक लोक तुझ्या वडिलांचा कारनामा पाहून हसतही होते. तसेच तू बघू शकते की, तुझ्या वडिलांच्या डोक्यात सतत काय सुरू असतं. तो एएक निर्लज्ज व्यक्ती आहे.
हिलरीचे एक्सचे वडील या फोटोंमुळे फारच डिस्टर्ब झाले होते आणि त्यांनी हे फोटो डिलीट केले होते. पण त्यांना सतत ही भीती होती की, त्यांचे हे फोटो लीक झाल्यावर त्यांच्या मुलाने काही करून घेऊ नये. प्रेस्टन कोर्टच्या जज सुजैन गोडार्ड यांनी महिलेचं हे कृत्य फारच वाईट असल्याचं सांगितलं. (हे पण वाचा : कोरोना काळात २ हजार सेक्स स्लेवसोबत होता किम जोंग उन, 'या' महिलेने केला खळबळजनक दावा!)
दरम्यान यावर्षीय ब्रिटनमध्ये 'रीवेंज पॉर्न' हा एक गुन्हा असल्याची घोषणा केली होती. यात सांगण्यात आले होते की, आपल्या एक्सचे प्रायव्हेट व्हिडीओ लीक किंवा व्हायरल केले तर दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. असं असलं तरी हिलरी वार्ड तुरूंगाच्या शिक्षेपासून वाचली आहे. तिला कम्युनिटी सर्व्हिस आणि अनपेड वर्कची शिक्षा मिळाली आहे.