काळं मीठ कसं तयार केलं जातं? व्हायरल व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2023 10:36 AM2023-11-03T10:36:58+5:302023-11-03T10:39:20+5:30

Black Salt Making : लोक चवीने काळं मीठ खातात. पण हे तयार कसं केलं जातं हे अनेकांना माहीत नसतं.

Black salt making in factory no body know secret behind manufacturing watch video | काळं मीठ कसं तयार केलं जातं? व्हायरल व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

काळं मीठ कसं तयार केलं जातं? व्हायरल व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...

Black Salt Making :  सामान्यपणे रोजच्या जेवणासाठी पांढऱ्या मिठाचा वापर केला जातो. पण काही असे पदार्थ असतात ज्यांची टेस्ट वाढवण्यासाठी काळ्या मिठाचा वापर केला जातो. लोक चवीने काळं मीठ खातात. पण हे तयार कसं केलं जातं हे अनेकांना माहीत नसतं. याचाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

काही लोक सांगतात की, काळं मीठ पाकिस्तानातून येतं तर काही म्हणतात की ते डोंगरातून आणलं जातं. पण अनेकांना हे माहीत नाही की, हे मीठ भारतातच बनवलं जातं. याचा एक व्हिडीओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

कसं तयार केलं जातं काळं मीठ?

काळं मीठ तयार करणं काही सोपं काम नाही. हे तयार करण्यासाठी मेहनतीसोबतच धोकाही खूप असतो. या व्हायरल व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, सगळ्यात आधी एका ट्रकमधून मिठाचे गडे काढले जातात. हे पांढरं असतं. जे जयपूरहून आणलं जातं. आधी भट्टी पेटवली जाते. त्यात कोळसा टाकला जातो.

मग या भट्टींवर काही मडके एका लाईनने ठेवले जातात आणि वरून कोळसा टाकला जातो. नंतर मडक्यांमध्ये पांढरं मीठ भरलं जातं. सोबतच बदामाची सालही टाकली जाते. ज्यामुळे मिठाचा रंग बदलतो. नंतर विटांच्या मदतीने मडके झाकले जातात. 24 तास ही मडकी अशीच असतात. नंतर ही मडकी काढली जातात. ती थंड झाल्यावर तोडून त्यातून काळं मीठ बाहेर काढलं जातं. 

हा व्हिडीओ इंस्टाग्राम पेजवर पोस्ट केला होता. काळं मीठ तयार कसं केलं जातं हे त्यात दाखवलं. या व्हिडिओला आतापर्यंत लोख व्ह्यूज, हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. 

यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, बदामाची साल नाही तर बाभळीची साल टाकली जाते. दुसऱ्याने लिहिलं की, चपलेखालचं मीठ कोण खाणार. तिसऱ्याने लिहिलं की, पहिल्यांदाच पाहिलं की, काळं मीठ कसं तयार केलं जातं

Web Title: Black salt making in factory no body know secret behind manufacturing watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.