रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 05:00 PM2021-07-15T17:00:02+5:302021-07-15T17:13:15+5:30

Dog gets royal life in America: भारतात रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला अमेरिकेतील महिलेने घेतले दत्तक.

blind stray dog from gwalior gets royal life in america | रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life

रस्त्यावर भटकणाऱ्या अंधळ्या कुत्र्याचं अचानक बदललं आयुष्य, आता अमेरिकेत जगतोय Royal Life

Next
ठळक मुद्देकालपर्यंत रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला आता अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये हक्काचं घर मिळालं आहे

नवी दिल्ली: रस्त्यावर फिरणाऱ्या आणि दारोदार भटकणाऱ्या एका कुत्र्याचं एका रात्रीत आयुष्य बदललं. तुम्हालाही वाटतं असेल की, या कुत्र्यासोबत नेमकं घडलं तरी काय, की एका रात्रीत तो रॉयल लाइफ जगू लागला. एका तरुणीच्या अथक प्रयत्नानंतर अगदी कालपर्यंत रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला आता अमेरिकेतील पेनसिल्वेनियामध्ये हक्काचं घर मिळालं आहे.

सविस्तर माहिती अशी की, 'जीव आश्रय' नावाच्या एका एनजीओला फेब्रुवारी महिन्यात ग्वालियरच्या रोडवर जखमी कुत्रा फिरत असल्याचा कॉल आला. एनजीओच्या संचालक मिनी खरे आपल्या टीमसोबत त्या ठिकाणी गेल्या. तिथे गेल्यावर त्यांनी कुत्र्याला पाहिले. त्या कुत्र्याच्या शरीराचा बराच भाग जळालेला होता. तो कुत्रा अतिशय तीव्र वेदनेनं व्हिवळत होता. मिनी यांी त्या कुत्र्याला आपल्या सोबत आणले आणि एनजीओमध्ये त्याच्यावर उपचार  सुरू केले.
 
कुत्रा अंधळा असल्याचं समजलं
उपचारादरम्यान तो कुत्रा अंधळा असल्याचं समजलं. काही दिवस त्या एनजीओमध्येच कुत्र्यावर उपचार करण्यात आले. यादरम्यान त्या कुत्र्याचं 'शिरी'असं नामकरणही झालं. मिनी खरे पुढे सांगतात की, शिरीवर उपचार केल्यानंतर ती ठीक झाली. पण, उपचारानंतर तिच्यासाठी चांगलं घर शोधणं कठीण काम होतं. शिरी अंधळी असल्यामुळे तिला कुणीच दत्तक घेण्यास तयार नव्हतं.  अनेक दिवस उलटुनही शिरीसाठी चांगलं घर मिळत नव्हतं.

दिल्लीवरुन पाठवलं अमेरिकेत
अखेर मिनी यांनी सोशल मीडियावर एक अभियान सुरू केलं. त्या अभियाना मार्फत दिल्लीतील एका पशु चिकित्सकाने अमेरिकेतील हेलेन ब्राउन यांच्याशी संपर्क केला. हेलेन अमेरिकेत भटक्या कुत्र्यांसाठी एनजीओ चालवतात. हेलेन यांनी शिरीला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर शिरीला दिल्लीवरुन अमेरिकेत पाठवण्यात आले. तिथे हेलेन यांनी औपचारिकरित्या शिरीला दत्तक घेतले. आता शिरी एकदम चांगले आयुष्य जगत आहे.

Web Title: blind stray dog from gwalior gets royal life in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.