Viral Ad banner: "दूध मांगोगे दूध देंगे.. खीर मांगोगे खीर देंगे", दोन वेगळ्या कंपन्यांनी लावले अर्धे-अर्धे बॅनर, नक्की काय आहे हा प्रकार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 05:27 PM2023-01-03T17:27:23+5:302023-01-03T17:28:19+5:30
जाहिरातीच्या युगात दुसऱ्या कंपनीपेक्षा आपला ब्रँड भव्यदिव्य दिसला पाहिजे, असं म्हणतात. पण इथे काही वेगळंच दिसून आलं.
Viral Ad banner: जाहिरातींचे जग इतके सर्जनशील आणि आश्चर्यकारक असते की बरेचदा कंपन्या अनेक हटके गोष्टी करतात आणि त्या विस्मयकारक गोष्टी पाहून लोकांनाही आश्चर्य वाटते. नुकतीच अशी एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही जाहिरात पाहून लोक सुरूवातील तर अक्षरश: हैराण झाले होते. या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे यात रस्त्यावरील दोन मोठ्या होर्डिंगवर वेगवेगळ्या कंपन्यांची होर्डिंग्स लावण्यात आली होती, पण महत्त्वाची बाब म्हणजे एका कंपनीने होर्डिंगवर जी ओळ लिहिली होती, त्याची उरलेली ओळ दुसऱ्या कंपनीच्या होर्डिंग वर लिहिल्याचे दिसून आले. त्यामुळे ती जाहिरात चांगलीच व्हायरल झाली.
'दूध मांगोगे दूध देंगे, खीर मांगोगे खीर देंगे'
वास्तविक ही जाहिरात Zomato आणि Blinkit या दोन कंपन्यांची आहे. हे स्वतः झोमॅटो आणि ब्लिंकीटच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पोस्ट करण्यात आले आहे. यामध्ये बोर्डावर ब्लिंकिटने लिहीले आहे, "दूध मांगोगे दूध देंगे". तर काही अंतरावर असलेल्या झोमॅटोच्या बोर्डवर लिहिले आहे, "खीर मांगोगे खीर देंगे."
असे का करण्यात आले आहे?
झोमॅटो ही ब्लिंकिटची मूळ कंपनी आहे. झोमॅटो ही ब्लिंकिटची मूळ कंपनी आहे हे अनेकांना माहीत नसेल. पूर्वी ते ग्रोफर्सच्या मालकीचे होते, नंतर जेव्हा ते झोमॅटोने विकत घेतले, तेव्हा त्याचे नाव ब्लिंकिट झाले. हे एक इन्स्टा कोलॅबरेशन आहे. म्हणजेच दोन कंपन्या एकमेकांना समर्पक अशी कार्यपद्धती आचरणात आणत आहेत. त्यामुळेच सध्या ही हटके जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. याच्या ओळी 'माँ तुझे सलाम' या चित्रपटातील संवादातून प्रेरित आहेत. त्यामुळेच लोक हा फोटो आणि ही संकल्पना शेअर करताना दिसत आहेत.