एका झाडाच्या सुरक्षेसाठी 24 तास तैनात असतात पोलीस, खर्च होणारी किंमत ऐकून व्हाल आवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 02:45 PM2020-03-26T14:45:36+5:302020-03-26T14:47:01+5:30
या झाडाच्या सुरक्षेसाठी तब्बल २४ तास पोलिस असतात.
राष्ट्रपतींपासून पतंप्रधानांपर्यंत किंवा शासकिय अधिकारी आणि नेते यांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी सुरक्षा दल असतं. हे तर तुम्हाला माहित असेल पण आज आम्ही तुम्हाला अशा झाडाबद्दल सांगणार आहोत ज्या झाडाच्या सुरक्षेसाठी करोडो रुपये खर्च होतात.
या झाडाच्या सुरक्षेसाठी तब्बल २४ तास पोलिस कार्यरत असतात. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ आणि विदिशा यांच्यामध्ये सलामतपूरमध्ये एक पर्वत आहे. त्या ठिकाणी हे झाडं आहे. या झाडाला एखाद्या व्हिआयपीप्रमाणे ट्रिटमेंट दिली जाते. चला तर मग जाणून घेऊया या झाडात असं आहे तरी काय.
या झाडाच्या सुरक्षेसाठी चार ते पाच जवान तैनात करण्यात आले आहेत. या झाडाला पाणी देण्यासाठी नगरपालिकेकडून खास पाण्याचा टँकर येतो. कृषी विभागाचे अधिकारी या झाडाची पाहणी करण्याासाठी प्रत्येक आठवड्याला येत असतात. तसचं झाडाची काळजी घेण्यासाठी तसंच सुरक्षेवर १२ ते १५ कोटी रुपये दर वर्षी खर्च होतात.
हे पिंपळाचं झाड आहे. या झाडाला बोधीवृक्ष या नावाने ओळखलं जातं. २०१२ मध्ये जेव्हा श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा यांनी भारत दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी हे झाड लावलं होतं. असं मानलं जातं की अनेक वर्षांपूर्वी भगवान बुध्दांना याच झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं होतं. बौद्ध धर्मात या झाडाला खूप महत्व आहे.
असं मानलं जातं की ई. स पूर्व तिसरा शतक असताना सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बोधी वृक्षाची फांदी देऊन बौद्ध धर्माचा प्रचार करण्याासाठी श्रीलंकेत पाठवलं होतं. यांनी श्रीलंकेतील अनुराधापुरा येथे हे झाडं लावलं होतं. श्रीलंकेतील हे झाड आजही तुम्हाला पहायला मिळेल.
या बोधी वृक्षाच्या खाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली.
ते झाडं बिहारच्या गया जिल्ह्यात आहे. अनेकांनी या झाडाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही हे झाडं नष्ट झालेलं नाही हा चमत्कार समजला जातो. सन १८७६ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे हे झाडं नष्ट झालं. पण १८८० मध्ये इंग्रज अधिकारी लॉर्ड कनिंघम यांनी श्रीलंकेतील बोधी वृक्षाच्या फांद्या मागवून पुन्हा या झाडाची स्थापना केली. आत्तापर्यंत हे झाडं त्याच ठिकाणी आहे. तुम्ही या झाडांना कधीही भेट देऊ शकता.