कबर खोदून बाहेर काढला मित्राचा मृतदेह, मग बाइकवर बसवून शहरात फिरवला; कारण....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:06 PM2021-12-04T18:06:09+5:302021-12-04T18:08:13+5:30
मित्राच्या एका ग्रुपचे फोटो व्हायरल झाले असून त्यात काही मित्र त्यांच्या एका मित्राचा मृतदेह 'अखेर'चा प्रवास करण्यासाठी मोटरसायकलवरून गावात फिरवतात.
असं म्हटलं जातं की, मैत्रीचं नातं हे सर्वात मोठं आणि चांगलं नातं असतं. अनेक व्हिडीओज आणि फोटोमधून मैत्रीचे अनेक किस्से समोर येत असतात. असे मित्राच्या एका ग्रुपचे फोटो व्हायरल झाले असून त्यात काही मित्र त्यांच्या एका मित्राचा मृतदेह 'अखेर'चा प्रवास करण्यासाठी मोटरसायकलवरून गावात फिरवतात. यासाठी त्यांनी कबर खोदून आपल्या मित्राचा मृतदेह बाहेर काढला.
क्वीटोमधील ही घटना आहे. मृत एरिक सेडेनोच्या मित्रांनी दावा केला होता की, त्यांना इक्वाडोर (Ecuador) त्यांच्या मित्राचा अंत्यसंस्कार करण्यासाठी आणि त्यांच्या मित्राचा मृतदेह कबरीतून काढण्यासाठी त्याच्या आई-वडिलांची परवानगी मिळाली आहे.
मृतदेह बाइकवरून फिरवला
मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, जवळपास ७ पुरूषांना एका मोटारसायकलजवळ बघण्यात आलं होतं. ते एक निर्जीव शरीर बाइकवर ठेवून शहरात फिरवत होते. मित्रांच्या ग्रुपने बाइक ते नेहमी चालवतात तशी चालवली आहे.
'डेली स्टार'च्या रिपोर्टनुसार, पुरूषांच्या ग्रुपचं म्हणणं आहे की, त्यांना त्यांच्या मित्रांना श्रद्धांजली द्यायची होती. ही त्यांच्या मित्राची शेवटची इच्छा होती. त्यांना अशाप्रकारेच त्यांच्या मित्राला निरोप द्यायचा होता आणि त्यांनी कबरेवर दारूच्या थेंबाचा शिडकावही केला. एरिकचा मृत्यू गेल्या आठवड्यात झाला होता. एरिक त्याच्या एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला जात होता आणि त्यावेळी अज्ञातांनी त्याच्यावर गोळी झाडली होती. त्याचं वय २१ होतं.
काय म्हणाले पोलीस?
पोलीस म्हणाले की, या शहरात असं पहिल्यांदाच झालं आहे. ही एक फार चुकीची पद्धत आहे. पोलिसांनी मित्रांच्या ग्रुपपैकी कुणालाही ताब्यात घेतलं नाही आणि तसेच कुणावरही काही कारवाई केली नाही. कारण अंत्यसंस्कार एक खाजगी कार्यक्रम मानला जातो आणि कुणा विरोधातही काही तक्रार झालेली नाही.
कबरीतून मृतदेह काढण्याचा रिवाज
जगातल्या अनेक भागांमध्ये मृत नातेवाईक आणि मित्रांची देखरेख करण्यासाठी मृतकांच्या कबरी खोदण्याचा रिवाज आहे. दक्षिण सुलावेसीच्या काही भागात तोराजामध्ये पारंपारिक रूपाने वर्षातून एकदा आपल्या मृत नातेवाईक आणि मित्रांचे मृतदेह कबरेतून बाहेर काढले जातात. ज्याला मेनने म्हटलं जातं.