५०० वर्ष जुन्या दुर्मीळ वस्तूचा लिलाव, २५०० चा कटोरा ३ कोटींमध्ये विकला जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 09:30 AM2021-03-04T09:30:19+5:302021-03-04T09:37:28+5:30
आता लिलावात या चीनी कटोऱ्याची बोली १५ हजार ते ५००,००० डॉलर दरम्यान ठेवली जाणार आहे. सर्वा किंमत देणाऱ्याला हा कटोरा दिला जाणार.
अमेरिकेत एक २५०० रूपयांचा चीनी मातीचा कटोरा ३.६ कोटी रूपयांना विकला जाऊ शकतो. कुणालाही प्रश्न पडेल इतकी ३ कोटींपेक्षा जास्त किंमत मिळायला या कटोऱ्यात असं काय आहे? रिपोर्ट्सनुसार हा कटोरा खास आहे. कारण हा कटोरा १५ शतकातील चीनी कलाकृतींपैकी एक आहे. चीनी मातीपासून तयार या कटोऱ्याला केवळ ३५ अमेरिकी डॉलरमध्ये खरेदी करण्यात आलं होतं.
आता लिलावात या चीनी कटोऱ्याची बोली १५ हजार ते ५००,००० डॉलर दरम्यान ठेवली जाणार आहे. सर्वा किंमत देणाऱ्याला हा कटोरा दिला जाणार. या कटोऱ्याचा लिलाव १७ मार्चला होणार आहे. फूल आणि इतर डिझाइन असलेल्या निळ्या चित्रांच्या पांढऱ्या कटोऱ्याचा व्यास जवळपास ६ इंच आहे. याचा लिलाव सोथबीमध्ये केला जाणार आहे. (हे पण वाचा : अद्भूत! Pompeii या प्राचीन शहरात सापडला 'प्रेमाच्या देवतेचा' २ हजार वर्ष जुना रथ!)
हा कटोरा जगात असलेल्या केवळ ८ कटोऱ्यांपैकी एक आहे. आता १७ मार्चला याचा लिलाव केला जाणार आहे. सोथबीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि कला विभाग चीनी कार्यांचे प्रमुख मॅकएटर म्हणाले की, 'हे लगेच स्पष्ट झालं होतं की, आम्ही वास्तवात काहीतरी अनोखं बघत आहोत. पेंटींगची शैली, कटोऱ्याचा आकार, निळा रंगही हा कटोरा १५ व्या शतकातील असल्याचं प्रमाण आहे'. त्यांनी सांगितले की, हा कटोरा १४०० च्या दशकात तयार केला होता. (हे पण वाचा : अंतराळात तयार होतंय जगातलं पहिलं हॉटेल; थिएटर, रेस्टॉरट अन् ४०० पाहूण्यांना मिळणार सुविधा, पाहा फोटो)
असं असलं तरी हा कटोरा किती जुना आहे याचं काही वैज्ञानिक परिक्षण केलं नाही. केवळ प्रशिक्षित लोकांनी आणि तज्ज्ञांनी हा कटोरा १५व्या शतकातील असल्याचा दावा केला आहे. कटोरा फारच मुलायम आणि चोपडा आहे. याची चमक रेशमी आणि रंग-डिझाइन त्या काळानुसार वेगळी आहे.